शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

१९ नगरसेवकांना तात्पुरता दिलासा

By admin | Updated: February 4, 2017 00:51 IST

जात वैधता प्रमाणपत्र प्रकरण : १३ फेबु्रवारीस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाकडे विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्यामुळे कारवाईच्या कचाट्यात सापडलेल्या महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला. नगरसेवकांची याचिका दाखल करून घेत दि. १३ फेबु्रवारीला पुढील सुनावणी ठेवली. अशाच प्रकारच्या अन्य एका याचिकेवर न्यायालयाने यापूर्वीच कारवाईला स्थगिती दिली असल्याने आपसूक या नगरसेवकांनाही त्यामुळे दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगास विहीत मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या नगरसेवकांचे पद कायद्यातील तरतुदीनुसार रद्द करावे, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आयोगाने कारवाईचा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठविला आहे. राज्य सरकार नगरसेवकपद रद्द करेल, या भीतीने राज्यभरातील काही नगरसेवक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांचाही समावेश आहे. महापौर हसिना फरास यांना नगरसेवकांनी सर्वाधिकार दिले असल्याने फरास यांनीच २५ जानेवारीस सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली. काल, शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होणार होती. फरास यांच्या याचिकेवर काम पाहण्याकरिता वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांना वकीलपत्र देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चल्लामेश्वर व न्यायमूर्ती सप्रे यांच्यासमोर ही याचिका होती. कामकाजाच्या सुरुवातीसच वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी अशाप्रकारच्या काही याचिका न्यायमूर्ती गोगाई यांच्यासमोर दाखल झाल्या असून १३ फेबु्रवारीला त्यावर सुनावणी होणार असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता न्यायालयाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची याचिकाही गोगाई यांच्या न्यायालयाकडे वर्ग केली. न्यायमूर्ती गोगाई यांच्या न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेतील वादींवर कारवाई करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या नगरसेवकांनाही त्याचा आपसूक फायदा झाला होईल.राज्य सरकारच्या कारवाईच्या कचाट्यात सापडलेल्या महानगरपालिकेतील नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन कारवाई थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती, तर महापौर हसिना फरास यांनी बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांची भेट घेऊन कायदेविषयक सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी श्री. पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्याशी फोनवर संपर्क साधून कोल्हापूरच्या नगरसेवकांचे वकीलपत्र घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या ‘शब्दा’वर सिब्बल यांनी शुक्रवारी न्यायालयात काम पाहिले.