शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

महाराष्ट्रातील प्रवाशांना तात्पुरती प्रवेश बंदी : कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 15:29 IST

महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित प्रवासी कर्नाटकात येत आहेत. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ई -पास असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांना कांही दिवस कोगनोळी टोल नाक्यावरून कर्नाटकात प्रवेश दिला जाऊ नये, असा सक्त आदेश शनिवारी कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील प्रवाशांना तात्पुरती प्रवेश बंदी : कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा आदेशसीमेवरील कोगनोळी नाक्याला भेट देऊन केली पाहणी

बेळगाव : महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित प्रवासी कर्नाटकात येत आहेत. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ई -पास असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांना कांही दिवस कोगनोळी टोल नाक्यावरून कर्नाटकात प्रवेश दिला जाऊ नये, असा सक्त आदेश शनिवारी कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला आहे.गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सकाळी निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथील कर्नाटक - महाराष्ट्र सीमेवरील अत्यंत महत्त्वाच्या कोगनोळी टोल नाक्याला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. याप्रसंगी गृहमंत्र्यांनी हा आदेश दिला आहे.

कर्नाटक राज्यात आढळून येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे महाराष्ट्रातून आलेले आहेत. काल शुक्रवारीच राज्यात नव्याने सापडलेल्या २४८ रुग्णांपैकी तब्बल २0७ कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्र रिटर्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर तुर्तास महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्याकडे ई -पास असला तरी कर्नाटकात प्रवेश दिला जाऊ नये, असे गृहमंत्री बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.कोगनोळी टोल नाका हा आंतरराज्य तपासणी नाका आहे. या नाक्यावरून हजारो लोक दररोज ये-जा करत असतात. तेंव्हा सरकारच्या मार्गदर्शक सूचीची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच कोरन्टाईनचा निर्धारित अवधी पूर्ण झाल्यानंतरच प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी जाऊ दिले जावे असे सांगून सेवा सिंधूअ‍ॅपच्या माध्यमातून ई-पास मिळालेल्यांची काटेकोर तपासणी केली जात असल्याबद्दल गृहमंत्र्यांनी कोगनोळी चेक पोस्ट येथील आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली.बेळगाव जिल्हा प्रशासनासह पोलीस खाते आणि आरोग्य खाते हे संयुक्तरीत्या कोगनोळी टोल नाका येथे उत्तम प्रकारे कार्य करत आहे, असे प्रशंसोद्गारही त्यांनी काढले. कोगनोळी टोल नाका येथे नियुक्त असलेल्या सर्वांनीच कोणाच्याही दबावाखाली न येता आपले काम करावे, असे सांगून या ठिकाणच्या कांही आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले आहे. तेंव्हा येथील सर्व कर्मचाऱ्यांनी स्वत:ची व्यवस्थित काळजी घेऊन काम करावे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी सक्तीने पीपीई किटचा वापर करावा, असे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.या टोल नाक्यावरून दररोज किती वाहने ये-जा करतात याची माहिती घेऊन यापुढे गुडस वाहन चालक आणि क्लीनर यांचीही आरोग्य तपासणी करण्याचा आदेश गृहमंत्र्यांनी दिला. तसेच टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी ८-८ तासाच्या शिफ्टमध्ये काम करावे, अशी सूचनाही केली.यावेळी त्यांनी आरोग्य खात्यासह पोलीस खात्याच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.राज्यातील संसर्गजन्य तबलिगींचा शोध लावून त्यांच्यावर उपचार करण्याची मोहीम पोलीस खात्याने यशस्वीरित्या पार पडली असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून नमूद केले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्या मध्ये पोलीस खात्याने अत्यंत महत्वाची भूमिका निभावली असल्याचे सांगून भविष्यातही आपण सर्वजण मिळून उत्तम कार्य करूया, असे गृहमंत्री बोम्मई यांनी सांगितले.गृहमंत्र्यांच्या शनिवारच्या पाहणी दौराप्रसंगी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी कोगनोळी टोल नाक्यावरील कामकाजाची माहिती दिली. तसेच ई-पास बाबत आॅनलाईन माहिती मिळाल्यास येथील कर्मचाऱ्यांचा वेळ वाचू शकतो, असे गृहमंत्र्यांना सांगितले.

गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी यावेळी कोगनोळी येथील सरकारी विश्रामधामालाहीही भेट देऊन पाहणी केली. गृहमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी त्यांच्यासमवेत विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी, आयजीपी राघवेंद्र सुहास, पोलीस आयुक्त लोकेश कुमार आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकbelgaonबेळगाव