आदिशक्ती आई चौंडेश्वरी या भूमिपुत्र व त्याच्या जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरीराजावर नेहमीच आपला कृपा आशीर्वाद ठेवते.
पुरातन काळात ह्याच भुतलावर राक्षसी प्रवृती नष्ट करण्यासाठी,देवदेवतांनी मानव रूप धारण करून मानव कल्याण करण्यासाठी त्यांना जन्म घ्यावा लागतो.
तेजोमय,शक्तिवर्धक, अदिशक्ती, नागदेवता आई चौंडेश्वरी होय. ।। ॐ महिषाघ्ये महामाये चामुंडे मुंडमालिनी ।।
।। आयुरारोग्य मैश्र्वर्य देही देवी नमोस्तुते ।।
आपल्या भुतलावर पुरातन काळापासून ज्या देवदेवतांची महात्म्ये वर्णिलेली आहेत. त्यांचे अनेक देवालये विविध ठिकाणी पुरातन काळापासून उभारली आहेत. त्यापैकीच हे मंदिर होय. आई देवी चौंडेश्वरीचा उल्लेख पुरातन ‘श्री मार्कंडेय पुरातनामध्ये’ पहावयास मिळतो.
...........
देवीचे वर्णन...
आई चौंडेश्वरी देवीची मूर्ती पाहताच ती मोहित व प्रसन्न करणारी वाटते. ती काळ्या पाषाणातून बनवलेली असून मूर्तीची उंची दीड ते दोन फूट आहे. मूर्तीचे वजन साधारण ३९ ते ४० किलो आहे. स्वयंभू असणारी ही मूर्ती आकर्षक आहे. कालांतराने मूर्तीस वर्जलेप करण्यात आला. ही मूर्ती चतुर्भुजा महिषासूर मर्दिनीच्या रूपात असून ती युद्ध आवारातील आहे. देवीच्या चेहऱ्यावरील तेजोमयता भाविकांना आणखी प्रसन्न करते.
मस्तकावर जटामुकुट त्यावरती शेष,डोळे,तेजस्वी व बोलके,नाकात नथ,कानात रत्नकुंडले,जटा मुकुटातून केसाचा बटा बाहेर जनू वार्यावरती झुलत आहेत, असा अभास होतो.
देवीचे चतुर्भुज मुखाजवळील उजवीकडील मागील हातात त्रिशुल,उजव्या पुढील हातात खड्ग म्हणजे खांडा तलवार ती यवनावरती उभारली आहे. मुलाच्या डाव्या मागील हातात महिषासुर राक्षसाची शेंडी मस्तक. तसेच देवीचा उजवा पाय जमिनीवर तर दुसरा डावा पाय दैत्याच्या पाठीवर ठेवलेला दिसतो. देवीच्या मागील बाजूस सिंह पहावयास मिळतो. तसेच विशाल अशी प्रभावळ पहावयास मिळते.
गळ्यात ग्रिवीका आणि हार आहे. दंडात केशुर,हातात कंकण,मेखला,पायात तोडे आणि गळ्यात मोत्यांची माळ अशी सुरेख मूर्तीवरील विजयी भाव प्रामुख्याने पहावयास मिळतो.