शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्विनी, राही, अंजली यांना राज्य शासनाचे बळ

By admin | Updated: May 20, 2015 00:15 IST

आॅलिम्पिक तयारी : प्रत्येकी पाच लाखांची मदत

कोल्हापूर : पुढील वर्षी होणाऱ्या ब्राझील आॅलिम्पिकच्या तयारीसाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत, राही सरनोबत आणि अंजली भागवत यांना राज्य शासनाने क्रीडा संचालनालयाच्या माध्यमातून पाच लाखांची मदत केली आहे. या मदतीचा धनादेश त्यांना देण्यात आला आहे.तेजस्विनी, राही आणि अंजली या महाराष्ट्राच्या सुवर्णकन्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा नावलौकिक केला आहे. त्याची नेमबाजीतील कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. आॅलिम्पिकमध्ये निवड होण्यासाठी चांगले गुणांकन आणि तयारी आवश्यक असते. त्यासाठी या नेमबाजपटूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे लागते. मात्र, या स्पर्धेसाठी होणारा खर्च स्वत: करणे परवडणारे नसते. त्यामुळे तेजस्विनी, राही व अंजली यांनी अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची मागणी राज्य शासनाकडे लेखी पत्राद्वारे केली होती. त्याची दखल घेत आणि या सुवर्णकन्यांच्या कामगिरीचा आलेख वाढत राहावा तसेच ब्राझील येथील रिओ दि जेनेरिओ याठिकाणी २०१६ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेची तयारीसाठी त्यांना आर्थिक पाठबळ कमी पडू नये. यासाठी शासनाने त्यांना प्रत्येकी पाच लाखांची मदत केली आहे. त्यातील तेजस्विनीला गेल्या तीन दिवसांपूर्वी शासनाने मदतीचा धनादेश दिला आहे. स्पर्धेनिमित्त सध्या राही व अंजली देशाबाहेर आहेत. त्यांच्या कुटुंबीयांकडे मदतीचा धनादेश देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)परफॉर्मन्स सुधारण्यासह गुणांकन वाढीसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणे आवश्यक असते. मी, अंजली आणि राहीने वैयक्तिकपणे खर्च करून काही स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. पण, वारंवार असा खर्च करणे आम्हाला जिकिरीचे ठरत होते. त्यामुळे आम्ही आर्थिक मदतीसाठी राज्य शासनाला विनंती केली. शासनाने त्याची तातडीने दखल घेत आम्हाला मदत केल्याचा आनंद आहे. शासनाने दिलेले पाठबळ आॅलिम्पिकसाठीच्या परफॉर्मन्स वाढीसाठी निश्चितपणे उपयोगी ठरेल.- तेजस्विनी सावंत, नेमबाजपटू