शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीच्या काळम्मावाडी नळ योजनेस लवकरच तांत्रिक मंजुरी

By admin | Updated: February 6, 2015 00:42 IST

स्वच्छ पाणीपुरवठा होणार : ६३१.८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित

इचलकरंजी : शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करणारी ६३१.८५ कोटी रुपये खर्चाची काळम्मावाडी थेट नळपाणी योजना जीवन प्राधिकरणकडे तांत्रिक मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहे. नजीकच्या दोन आठवड्यांत काळम्मावाडी योजनेला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे.साधारणत: ३० वर्षांपूर्वी पंचगंगा नदीचे पाणी दूषित होऊ लागले. परिणामी, उन्हाळ्याच्या हंगामामध्ये शहरास पाणीपुरवठा करणारी नळपाणी योजना दूषित पाण्यामुळे किंवा नदीपात्रात पाणी नसल्याने बंद ठेवावी लागली. त्यावेळी तत्कालीन राज्यमंत्री प्रकाश आवाडे यांनी कृष्णा नदीतून पाणी आणणारी योजना आखली. ही योजना मार्गी लागली आणि आता गेली १४ वर्षे कृष्णा नदी व पंचगंगा नदी अशा दोन्हीही नद्यांचे पाणी शहरवासीयांना मिळते.शहराची वाढती लोकसंख्या पाहता या दोन्ही योजनांचे पाणी कमी पडू लागले. उन्हाळ्यात पंचगंगा नदीतील पाणी दूषित झाल्याने ही योजना बंद ठेवावी लागते. फक्तकृष्णा नळ योजनेतून पाणी उचलल्यामुळे शहरास दोन ते तीन दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा होतो. त्यामुळे प्रथम वारणा नदीतून पाणी आणण्याचा प्रस्ताव समोर आला; पण वारणा नदीतील पाणीसुद्धा भविष्यात दूषित होणार, म्हणून कोल्हापूर शहराप्रमाणे इचलकरंजी शहरासाठी काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी आणण्याची योजना सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून मंजूर करण्यात आली. सध्या काळम्मावाडी योजना ६३१.८५ कोटी रुपये खर्चाची असून, ती जीवन प्राधिकरणकडे तांत्रिक मंजुरीसाठी प्रलंबित आहे. याबाबत सध्याचे आमदार सुरेश हाळवणकर हे जातीने पाठपुरावा करत असून, त्यांच्या म्हणण्यानुसार राज्य व केंद्र शासनाच्या शंभर टक्के अनुदानावर विशेष बाब म्हणून ही योजना कार्यान्वित करावयाची आहे. ज्याचा बोजा इचलकरंजीतील नागरिकांवर पडणार नाही. जीवन प्राधिकरणाच्या तांत्रिक मंजुरीनंतर राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित करण्याचे प्रयत्न नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी करीत आहेत. (प्रतिनिधी)