शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

शौचालय सर्वेक्षणास शिक्षकांची नकारघंटा

By admin | Updated: July 4, 2015 00:04 IST

ठिय्या आंदोलनाद्वारे विरोध : संघटनांचा नियोजनाच्या बैठकीवर बहिष्कार; कारवाई करण्याचा उपायुक्तांचा इशारा

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षकांनी शौचालयांचा सर्व्हे (सर्वेक्षण) करण्यास शुक्रवारी नकार दर्शविला. सर्व्हेच्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीवर पाच शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला. तसेच शौचालयांचा सर्व्हे करण्यास नकार देणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे वक्तव्य उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी केल्याने त्यांच्या या भूमिकेचा निषेध केला. बैठकीच्या ठिकाणी संघटनांचे पदधिकारी, शिक्षकांनी ठिय्या आंदोलन केले. शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार आज, शनिवारी शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याबरोबर महानगरपालिका परिसरातील किती कुटुंबांकडे शौचालय आहे किंवा नाही, याचाही शोध घेण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने शिक्षकांना दिला आहे. त्याच्या नियोजनासाठी शुक्रवारी साडेअकरा वाजता रंकाळा टॉवर येथील मामा भोसले शाळेत महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे विभागीय अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या मुख्याध्यापक, शिक्षकांची बैठक आयोजित केली होती. यासाठी शिक्षण मंडळातील काही अधिकारी तसेच खासगी प्राथमिक शिक्षक महासंघ, खासगी प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) जनगणना, निवडणुका, आपत्ती व्यवस्थापन ही कामे शिक्षकांनी करावयाची आहेत. शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करण्याच्या मूळ कामास विरोध नाही. मात्र, शौचालयांचा सर्व्हे करण्याच्या अतिरिक्त कामाबाबत त्यांनी नकार व्यक्त केला. त्याची माहिती शिक्षण मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळविली. त्यानंतर याठिकाणी उपायुक्त अश्विनी वाघमळे दाखल झाल्या. त्यांनी येथे शिक्षकांचे निवेदन स्वीकारले नाही, शिवाय शौचालयांचा सर्व्हे करण्यास नकार देणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे वक्तव्य केले. त्यावरून शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व उपायुक्त वाघमळे यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. उपायुक्तांच्या अशा भूमिकेमुळे संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक संतप्त झाले. त्यांनी विद्यालयाच्या बाहेर ठिय्या मारला शिवाय नियोजनाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. तसेच येथे निषेध सभा घेऊन महापालिकेच्या भूमिकेला विरोध दर्शविला.यावेळी शिक्षक महासंघाचे राजेंद्र कोरे, संतोष आयरे, मोहन आवळे, खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे भरत रसाळे, आनंदा हिरूगडे, शिक्षक संघाचे सुनील गणबावले, शिक्षक समितीचे सुधाकर सावंत, संजय पाटील, पुरोगामी संघटनेचे विलास पिंगळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शहराचा ‘स्मार्ट सिटी’साठीचा प्रस्ताव तयार करण्यातील पहिला टप्पा शौचालयांची माहिती मिळविण्याचा आहे. याबाबत नगरविकास विभागाकडून आलेल्या आदेशानुसार शौचालयांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार शिक्षकांना आदेश दिले. सर्वेक्षणाबाबतचा अंतिम निर्णय आयुक्त घेणार आहेत. त्यामुळे शिक्षकांचे निवेदन मी स्वीकारले नाही. काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जाईल.- अश्विनी वाघमळे, उपायुक्तशाळाबाह्य मुलांचा सर्व्हे हे काम शैक्षणिक हिताचे असल्याने ते आम्ही करणार आहोत. मात्र, शौचालयांचा सर्व्हे हे अशैक्षणिक काम आहे. याबाबत शिक्षण विभाग, संघटनाचा विचार न घेता अचानकपणे हे काम शिक्षकांवर लादण्यात आले आहे. त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे. - भरत रसाळे, राज्याध्यक्ष, राज्य खा. प्रा. शि. सेवक समितीशौचालयांचा सर्व्हे हे अशैक्षणिक काम आहे. त्यामुळे ते शिक्षक करणार नसल्याबाबतचे निवेदन उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी स्वीकारले नाही. शिवाय निवेदन स्वीकारू नये, अशा सूचना त्यांनी महापालिकेच्या आवक-जावक विभागाला दिल्या. त्यामुळे संयुक्त संघटनांचे निवेदन या विभागाने स्वीकारले नाही. प्रशासनाची भूमिका चुकीची आहे.- राजेंद्र कोरे, विभागीय अध्यक्ष, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघ