शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा पळ; मुलांचा ‘खेळ’

By admin | Updated: January 10, 2015 00:13 IST

शाहू माध्यमिक आश्रमशाळा : मारहाणीच्या भीतीपोटी सर्वच शिक्षक झाले गायब

कोल्हापूर : शाळेतील कर्मचाऱ्यांनाच दोषी ठरवीत आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या जखमी सूरज पवारच्या नातेवाइकांनी थेट शाळेवरच हल्ला करीत शिक्षकांना बेदम मारहाण केली होती. या प्रकारामुळे काल, मंगळवारी रात्रीनंतर निवासी शिक्षकांनी संस्थेतूनच भीतीपोटी पळ काढला. त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रूपेश पाटील यांनी घरी नेले. हे विद्यार्थी आज, बुधवारी शाळेस आले. मात्र, शिक्षकच हजर नसल्याने या विद्यार्थांची चलबिचल ुसुरू होती. ते गोंधळून गेले होते. भारतीय भटके, विमुक्त, विकास व संशोधन संस्था, सातारा या संस्थेची पाचगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू माध्यमिक आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे शंभर विद्यार्थी आहेत. ३० डिसेंबर रोजी शाळेतील वायर चोरल्याच्या आरोपावरून सूरज शेळके याला अधीक्षक जाधव यांनी शिक्षा केली होती. या रागापोटी सूरजने मामाच्या उचगाव येथील घरी स्वत:वर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात सूरज गंभीर जखमी झाला. त्यामुळे चिडलेल्या नातेवाइकांनी मंगळवारी थेट शाळेवरच हल्ला चढवीत दिसेल त्या शिक्षकांना धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे त्या शिक्षकांनी मंगळवारी रात्रीपासून शंभर विद्यार्थ्यांना संस्थेतच सोडून पळ काढला. याची माहिती शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रूपेश पाटील यांना समजताच त्यांनी आश्रमशाळेत धाव घेत रात्री १०० मुलांना आपल्या घरी नेले. पुन्हा आज, बुधवारी सकाळी या मुलांना शाळेत आणून सोडले. सकाळी नऊ वाजता सुरू होणारी शाळा दुपारी बारा वाजले तरी सुरू झाली नाही. त्यामुळे पुन्हा पाटील यांनी सातारा येथून अतिरिक्त कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. या मुलांशी संवाद साधला असता त्यांनी शिक्षक व अधीक्षक चांगले आहेत. चूक केल्यानंतर ते आम्हाला समजावून सांगतात. जास्त दंगा केला तर थोडे जास्त चिडतात, असे सांगितले. प्रतिक्रियापाचगाव येथील राजर्षी छत्रपती शाहू आश्रमशाळेतील अधीक्षक व शाळेतील शिक्षकांना सूरज पवारच्या नातेवाइकांनी मारहाण केली. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेवर बंदोबस्त ठेवला आहे. या प्रकरणाची चौकशी करवीर पोलीस करीत आहेत. - दयानंद ढोमे, पोलीस निरीक्षक, करवीर पोलीस ठाणेकाय प्रकार झाला आम्हाला माहीत नाही. आम्हा दहावीच्या विद्यार्थ्यांना काळजी लागून राहिली आहे. यंदा आमचे दहावीचे वर्ष आहे. जे शाळेत शिकविले जाते, त्याच्याच आधारावर आम्ही शिकत आहोत. त्यामुळे शाळा लवकरात लवकर सुुरू व्हावी.- तृप्ती हेगडे, विद्यार्र्थिनीमारहाण झाल्याने शिक्षक संस्थेतील कोणालाही काहीही न सांगता निघून गेले. त्यामुळे मुलांच्या काळजीपोटी मी गिरगाव येथील घरी १०० मुलांना घेऊन गेलो. आज, या प्रकरणाबद्दल माझे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. - रूपेश पाटील, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, कोल्हापूर ‘तू पारधी समाजाचा आहेस. तुझ्याकडून हे शिकणे होणार नाही. तू असाच आहेस,’ असे वारंवार जाणीवपूर्वक येथील शिक्षक सूरजला बोलत होते. यातच त्याच्यावर चोरीचा आरोप ठेवला. त्यामुळे सूरजने घरी आल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. - मारुती चव्हाण, सूरज पवारचे मामा संस्थेतील विद्यार्थी सूरज पवार हा रीतसर रजाचिठ्ठी देऊन घरी गेला होता. त्याला अधीक्षक व कोणत्याही शिक्षकाने मारहाण केलेली नाही. - तानाजी घोरपडे, प्रभारी मुख्याध्यापक ,राजर्षी छत्रपती शाहू आश्रमशाळा जेवण जरा उशिराचसंस्थेतील १०० मुलांना जेवण करून घालणारी एकच मावशी हजर असल्याने बुधवारी मुलांना दुपारचे जेवण थोडे उशिराच मिळाले. बुधवारी स्वयंपाक करणाऱ्या शुभांगी कदम यांच्या मदतीला शाळेतील महिला शिपाई मंगल नागराळे या धावून आल्या. त्यांनी या मुलांना चपाती करून घालण्यास मदत केली; तर संस्थेच्या सातारा कार्यालयातून आणखी दोन कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पाठविण्यात आले.शाळेत बंदोबस्तया संस्थेचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे अध्यक्ष आहेत. माजी आमदार लक्ष्मण माने हे कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण आता संस्थेचा व्यवहार पाहत नसून संचालक समता माने यांच्याशी संपर्क साधावा, असे सुचविले. समता माने यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, शाळेत एकूण नऊ शिक्षक आहेत परंतु ते भीतीपोटी निघून गेले आहेत म्हणून संस्थेने साताऱ्यातून दोन कर्मचारी मुलांच्या देखभालीसाठी पाठविले आहेत. शाळेत पोलीस बंदोबस्त आहे. शिक्षकांनी हजर व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.