शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा पत्ताच नाही... प्राचार्यही प्रभारी...

By admin | Updated: December 16, 2014 00:04 IST

आवश्यक साधनेही नाहीत : राधानगरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अवस्था

संजय पारकर-राधानगरी -दीर्घ संघर्षातून येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी अद्ययावत इमारत झाली. मुलांची संख्याही पुरेशी आहे. मात्र, त्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नाहीत. निधीअभावी आवश्यक साधनेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे संस्था म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’, अशी स्थिती आहे. अनेक वर्षांपासून येथील प्राचार्यच प्रभारी आहेत. त्यांचेही याबाबत दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे.वीस वर्षांपूर्वी मिनी औद्योगिक प्रशिक्षक संस्था सुरू झाली. तालुका तेथे आयटीआय या धोरणानुसार मागील काही वर्षांपासून पूर्ण प्रशिक्षक संस्थेत तिचे रूपांतर झाले. प्रारंभी खासगी जागेत वर्ग भरत होते. दहा वर्षांपूर्वी नवीन इमारत मंजूर झाली. जागाही उपलब्ध झाली, पण तेथे जागा रस्त्याबाबत अडचणी निर्माण झाल्यामुळे न्यायालयीन दावे, प्रतिदावे, आंदोलने, अशा प्रक्रियेतून चार-पाच वर्ष इमारत रेंगाळली होती. अडथळ्याची शर्यत पूर्ण करून इमारत पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांची सोय होईल, असे अपेक्षित होते. तालुक्यातील विद्यार्थ्यांचा व्यावसायिक शिक्षक होण्यासठी ओघ वाढल्याने दोन सत्रात वर्ग सुरू करण्यात आले आहेत.दुसऱ्या सत्रातील वर्गांना शिल्प निदेशक, वीजतंत्री, यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स, फिटासंधाता, गणित, चित्रकला या विषयांसाठी कायमस्वरूपी शिक्षक असल्याने कंत्राटी स्वरूपात नेमणुका केल्या जातात. मात्र, या शिक्षकांना नोव्हेंबर २०१३ पासून मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे यावर्षीच्या सत्रापासून ही पदेच रिक्त आहेत. अर्धे वर्ष संपूनही विद्यार्थ्यांना या विषयांचा गंधही नाही. अंतिम परीक्षासाठी सर्वच औद्योगिक प्रशिक्षक संस्थेमध्ये वजावट गुण पद्धत लागू केली आहे. याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.येथे नेमणुकीस असलेले प्राचार्य बागेवाडी हे अनेक वर्षापासून प्रभारीच आहेत. ते क्वचितच संस्थेत येतात. येथील बराचसा कारभार येथील एक निदेशक पाहतात. त्यामुळे येथील कामकाजात बराच गोंधळ आहे. येथे कोणाचा पायपोस कोणाला नाही, अशी स्थिती आहे. येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दोन-तीनवेळा संस्थेत जाऊन आंदोलन केले आहे. त्या त्यावेळी वेळ मारून नेण्याचे प्रयत्न झाले, पण नंतर स्थिती ‘जैसे थे’ अशीच राहिली आहे.येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गैरसोयीबाबत सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील व संंबंधित विभागाचे मंत्री, अधिकारी यांना भेटून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- दीपक शिरगांवकर, उपाध्यक्ष तालुका भाजपयेथील रिक्त पदे व निधीबाबत पुणे येथील व्यवसाय शिक्षक व प्रशिक्षण सहसंचालक यांच्याकडे बऱ्याचवेळा पत्रव्यवहार केला आहे.- एस. एस. बागेवाडी, प्रभारी प्राचार्य