शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांकडून शासनाचा दशविधी

By admin | Updated: June 11, 2016 00:28 IST

विनाअनुदानित शाळांचे प्रश्न : आंदोलनाचा दहावा दिवस; पंचगंगा घाटावर अभिनव आंदोलन

कोल्हापूर : राज्यातील अनुदानपात्र शाळांना त्वरित अनुदान द्यावे, या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य शासनाचा निषेध विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी शुक्रवारी प्रतीकात्मक दशविधी घालून केला. शुक्रवारी आंदोलनाच्या दहाव्या दिवशी पंचगंगा नदीघाटावर त्यांनी हे अभिनव आंदोलन केले.अनुदानपात्र ठरलेल्या शाळा व वर्गतुकड्यांना शासनाकडून त्वरित वेतन व अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. शिक्षकांच्या या आंदोलनाची सुरुवात होऊन नऊ दिवस उलटले तरी, शासन हे अनुदान देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने शिक्षकांनी शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास पंचगंगा नदीघाटावर प्रतीकात्मक दशविधी घालून शासनाचा निषेध केला. यावेळी आंदोलनकर्त्या काही शिक्षकांनी मुंडणदेखील केले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे, गजानन काटकर, प्रकाश पाटील, शिवाजी खापणे, बबनराव पेटकर, एम. के. पवार, राजू भोरे, अर्जुन पवार, मोहन पिसाळ, संभाजी आडूरकर, शिवाजी गायकवाड, विशाल देसाई, महासंघाचे संतोष आयरे, राजेंद्र कोरे, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यावर आज मोर्चाअनुदान देण्याबाबतचा शासकीय आदेश दोन दिवसांत काढण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी ७ जूनला जाहीर केले होते. मात्र, त्याची अद्याप कार्यवाही झाली नसल्याने शासनाच्या निषेधार्थ आम्ही शुक्रवारी दशविधी केल्याचे कृती समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. ते म्हणाले, औरंगाबाद येथील उपोषणकर्ते शिक्षक गजानन खरात यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. याप्रकरणी शासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आज, शनिवारी दुपारी एक वाजता लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापुरातील उपोषणकर्त्या शिक्षकांची प्रकृती खालावली आहे. शासनाने लवकरात लवकर अनुदान मान्यतेचा शासकीय आदेश न काढल्यास आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविणार असल्याचे जगदाळे यांनी यावेळी सांगितले.