शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बँक संचालकांवर ‘८८’ची कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:47 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सहकार ‘कलम ८८’नुसार चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी शुक्रवारी दिले. हातकणंगलेचे उपनिबंधक मनोहर माळी यांना जबाबदारी निश्चितीसाठी प्राधिकृत केले असून बँकेच्या सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४७ लाख ४६ हजार रुपयांचे केलेले नुकसान वसुलीची प्रक्रिया सुरू झाल्याने ...

ठळक मुद्दे मनोहर माळी यांची नियुक्ती : ४८ लाख नुकसानीची जबाबदारी निश्चित होणार; ‘गुरुजीं’चे धाबे दणाणलेजिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी चौकशी करून संचालकांवर जबाबदारी निश्चितीचे आदेश करवीरचे सहायक निबंधक सुनील धायगुडे यांना प्राधीकृत करण्यात आले.

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सहकार ‘कलम ८८’नुसार चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी शुक्रवारी दिले. हातकणंगलेचे उपनिबंधक मनोहर माळी यांना जबाबदारी निश्चितीसाठी प्राधिकृत केले असून बँकेच्या सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४७ लाख ४६ हजार रुपयांचे केलेले नुकसान वसुलीची प्रक्रिया सुरू झाल्याने ‘गुरुजीं’चे धाबे दणाणले आहे.

शिक्षक बँकेने चुकीच्या पद्धतीने कामकाज केल्याने रिझर्व्ह बँकेने दोनवेळा आर्थिक दंड केला. लेखापरीक्षकांना सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील तपासणीत ठपके ठेवले होते. त्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे पुढील कारवाईबाबत अहवाल सादर केला होता. त्यानुसार आॅक्टोबर २०१६ मध्ये बँकेची ‘कलम ८३’नुसार चौकशी करण्यासाठी करवीरचे सहायक निबंधक सुनील धायगुडे यांना प्राधीकृत करण्यात आले. त्यांनी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या कामकाजातील प्रमुख चौदा मुद्द्यांची सखोल चौकशी केली. त्यामध्ये एकरकमी परतफेडी योजनेतंर्गत संचालकांनी सहा खातेदारांना नियमबाह्य २ लाख २२ हजार ४३० रुपयांची विशेष सवलत दिल्याचे स्पष्ट झाले.

बँकेच्या सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात ४९ लाख १४ हजार ९१९ रुपये नफा झाल्याचा दिसतो, पण त्यावर २ टक्क्यांप्रमाणे ३५ लाख २३ हजार ५८८ रुपये सभासदांना लाभांश वाटप केला आहे. बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट १९४९, ‘कलम ३५’ नुसार रिझर्व्ह बँकेच्या तपासणीत पूर्वपरवानगीशिवाय लाभांश वाटप केल्याने दहा लाखांचा दंड केला. ४७ लाख ४६ हजारांचे नुकसान केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. हा अहवाल सुनील धायगुडे यांनी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे दिला. यानुसार जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी चौकशी करून संचालकांवर जबाबदारी निश्चितीचे आदेश शुक्रवारी दिले.‘८३’च्या चौकशीतील ठपकेएन.पी.ए. तरतूद, व्याजाची चुकीची केलेली तरतूद, आयकर कायद्याप्रमाणे झीज आकारणी नाही, आॅडिट फीची तरतूद, निवडणूक खर्च, मुदत संपलेल्या ठेवींवर देणे व्याज तरतूद.यांच्यावर होणार जबाबदारी निश्चितीराजाराम वरूटे, वसंत जोशिलकर, रवीकुमार पाटील, सुभाष निकम, रघुनाथ खोत, पांडुरंग केणे, बळवंत पाटील, रावसाहेब देसाई, राजमोहन पाटील, दगडू पाटील, रामचंद्र मोहिते, वसंत जाधव, उत्तम सुतार, शंकर भोई, सुरेश कांबळे, रंजना माळी, कावेरी चव्हाण, रत्नमाला खेमाजी, बाळासो पाटील, सुधाकर शिवुडकर, बजरंग लगारे, नामदेव रेपे, आण्णासो शिरगांवे, गणपती पाटील, संभाजी बापट, साहेब शेख, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, प्रसाद पाटील, अरुण पाटील, धोंडिराम पाटील, प्रशांतकुमार पोतदार, सुरेश कोळी, बाजीराव कांबळे, स्मिता डिग्रजे, लक्ष्मी पाटील. अधिकारी - आनंदराव शिंदे (सीईओ), मोहन भारते (सीईओ), मधुकर भालकर (अकौंटट), दिलीप खराडे (अकौटंट).चार महिन्यांनंतर ‘८८’ची कारवाईसुनील धायगुडे यांनी ‘८३’चा अहवाल मार्च महिन्यात जिल्हा उपनिबंधकांना सादर केला होता. त्यानंतर ‘कलम ८८’ नुसार जबाबदारी निश्चितीची कारवाई करण्यासाठी४ महिन्यांचा कालावधी लोटला.एकरकमी परतफेड नियमबाह्य सूट -२ लाख २२ हजार ४३०नियमबाह्य लाभांश वाटप -३५ लाख २३ हजार ५८८लाभांश वाटपावर झालेला दंड - १० लाख