शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बँकेच्या सभेत खडाजंगी

By admin | Updated: August 1, 2016 00:42 IST

पाच तास मॅरेथॉन चर्चा : नफा-तोटा पत्रक चर्चेचे; गगनबावडा, कागल, मुदाळतिट्टा येथे नवीन शाखा

कोल्हापूर : मासिक वर्गणी, नफा-तोटा पत्रक, विविध ठेवींवरील व्याजाची तरतूद यावरून प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी धारेवर धरले. काही गोंधळाचा अपवादवगळता तब्बल पाच तास मॅरेथॉन सभा चालली. गगनबावडा, कागल, मुदाळतिट्टा येथे नवीन शाखा, मासिक वर्गणी ७०० वरून ५०० करणे असे निर्णय झाले. बँकेची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी आर्यविन मल्टिपर्पज हॉल येथे झाली. अध्यक्षस्थानी राजमोहन पाटील होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन भारते मागील सभेच्या प्रोसेडिंगमधील मासिक वर्गणी वाढीचा ठराव वाचताना त्यावर रवळू पाटील व रवी पाटील यांनी आक्षेप घेतला. वर्गणी वाढीचा ठराव सभेने नामंजूर करूनही सातशे रुपये वसुली कशी करता? ठराव रद्द करण्याची मागणी त्यांनी केली; पण ठराव नामंजूर करता येणार नसल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. या विषयावर बोलण्यास उठलेले ‘पुरोगामी’चे प्रसाद पाटील यांना रोखत सर्वसाधारण सभेचा दिवस सभासदांचा आहे, संचालकांचा नाही, असे साताप्पा चौगले व बशीर पटाईत यांनी सांगितल्यानंतर गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर सभा सुरू झाली. मागील प्रोसेडिंगमधील चर्चेवर आक्षेप घेत जितका वेळ प्रोसेडिंग वाचत आहात, तेवढा वेळ गेल्यावर्षी सभा तरी चालली का? असा सवाल कृष्णात कारंडे व राजेंद्र पाटील यांनी केला. त्यामध्ये हस्तक्षेप करत सभासदांची भावना लक्षात घेऊन बहुमताने हा ठराव नामंजूर झाल्याने वर्गणी पाचशे रुपये करण्याची मागणी सतीश बरगे यांनी केली. त्यावर पाचशे रुपये करत असल्याची घोषणा अध्यक्ष पाटील यांनी केली. नफा-तोटा पत्रकासह अहवालावर आक्षेप घेत विविध ठेवींवर व्याज आकारणीची तरतूद न करता केवळ १५ लाख नफा दिसत असेल प्रत्यक्षात बँक पावणे दोन कोटींनी तोट्यात असल्याचा आरोप रवी शेंडे, कृष्णात कारंडे यांनी केला. नाममात्र सभासद पोटनियम दुरुस्ती फेटाळली आश्रम शाळा, अंगणवाडी सेविका, वर्ग-३ व ४ चे कर्मचाऱ्यांना नाममात्र सभासद करून घेण्याबाबत पोटनियम दुरुस्ती सूचविली होती. पण त्यावर जोरदार हरकत घेत ती फेटाळण्यात आली. उर्वरित पोटनियम दुरुस्ती मंजूर करण्यात आली. प्रसाद पाटील न्यायालयात जाणार प्रत्येक सभेत आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणारे प्रसाद पाटील यांना सत्ताधाऱ्यांनी रोखले. याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. सर गणित चुकतेय... बॅँक तोट्यात असताना लाखो रुपये खर्च करून एवढे चकचकीत अहवाल कशासाठी काढले, असा सवाल करत सर गणित कोठे चुकते ते बघा, असा सल्ला भाट (शिरोळ) यांनी दिला. मग कोणता अहवाल बोगस? गेल्या वर्षी खर्च जास्त होऊन ही लेखापरीक्षकांनी ‘अ’ वर्ग दिला. पण यावर्षी खर्च कमी होऊन ‘ब’ वर्ग कसा? कोणत्या वर्षीचा अहवाल बोगस असा सवाल जहीद मुजावर यांनी केला. राजमोहन यांची मुत्सद्देगिरी पोलिस यंत्रणेचा दबाव, प्रसारमाध्यमांचे लक्ष यामुळे सभा शांततेत पार पाडणे अध्यक्ष राजमोहन पाटील यांच्यासमोर आव्हान होते. सुरुवातीपासूनच पाटील यांनी सावध भूमिका घेत पाच तास विरोधकांच्या प्रश्नांच्या भडिमाराला त्याच ताकदीने उत्तर देऊन सभा चालविली. त्यांच्या मुत्सद्देगिरीची चर्चा सभास्थळी सुरू होती. बंदोबस्तामुळे सावध चर्चा बॅँकेने पाच कॅमेऱ्यांसह पोलिस बंदोबस्त ठेवला होता. पहिल्यांदा गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांनी तराटणी दिल्यानंतर तेथून पुढे सावधच चर्चा झाली. सत्तारूढ व्यासपीठावर; विरोधक खाली सहा वर्षांत पहिल्यांदाच संचालक व्यासपीठावर बसले. पण विरोधी चार संचालक सभासदांमध्ये बसले. अरुण पाटील मात्र सत्ताधाऱ्यांबरोबर व्यासपीठावरच बसले. ‘एटीएम’मध्ये खड्डा! एटीएममधून पैसे बाहेर येत नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांकडे केल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे पैसे खड्ड्यात पडतात, असे म्हटल्याचे एका सभासदाने सांगितले. एकंदरीतच एटीएम कंपनीने प्रचंड त्रास दिला असून, कंपनी बोगस असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.