शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

शिक्षक बँकेत सुडाचे राजकारण

By admin | Updated: August 27, 2015 00:39 IST

पाटील, कारंडेंचा आरोप : आकस्मिक कर्ज रोखले, अध्यक्षांचा आठमुठेपणा

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेचे सभासद तुषार पाटील हे आकस्मिक कर्जासाठी पात्र असताना बँकेचे अध्यक्ष राजमोहन पाटील यांनी त्यांचे कर्जप्रकरण रोखले. पाटील यांची आई गंभीर आजारी असताना, सत्ताधारी मंडळींनी सुडाचे राजकारणातून अडवणूक सुरू केल्याचा आरोप बँकेचे संचालक प्रसाद पाटील व शिक्षक नेते कृष्णात कारंडे यांनी पत्रकार परिषदेत केला. पाटील व कारंडे म्हणाले, तुषार माणिकराव पाटील (विद्यामंदिर आरळे, करवीर) यांना मातोश्री सुनीता पाटील या गंभीर आजारी असल्याने त्यांच्या उपचारासाठी एक लाख रुपये आकस्मिक कर्ज हवे होते. त्यांनी बुधवारी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून करवीर शाखेत अर्ज दाखल केला, पण कर्ज नामंजूर केल्याचे शाखाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन भारते यांच्याकडे चौकशी केली असता, बँकेचे अध्यक्ष राजमोहन पाटील यांच्या सूचनेनुसार व त्यांच्याशी केलेल्या चर्चेअंती आपले कर्ज नामंजूर केल्याचे लेखीच पाटील यांना दिले. मला चैनीसाठी नव्हे; तर आई आजारी असल्याने कर्जाची गरज असल्याची विनवणी त्यांनी भारते यांना केली, पण मला कर्ज देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत आम्ही जाब विचारला, अध्यक्षांच्या सूचना असल्याने मला काहीही करता येत नसल्याचे भारते यांनी सांगितले. आम्ही अध्यक्ष राजमोहन पाटील यांना दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. निवडणुकीपुरते राजकारण आम्ही समजू शकतो, पण सभासदांच्या हक्कातही कोणी राजकारण आणणार असेल तर त्याची गय केली जाणार नसल्याचा इशारा प्रसाद पाटील व कृष्णात कारंडे यांनी दिला. याबाबत जिल्हा उपनिबंधक व सहकार न्यायालयात दाद मागणार असून या प्रवृत्तीला धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे पाटील व कारंडे यांनी सांगितले. सभासदांच्या हितासाठी बँक आहे, असा आडमुठेपणा करून अध्यक्ष कोणाचे हित जोपासत आहेत. बँक राजमोहन पाटील यांची आहे का? याचे उत्तर सत्ताधाऱ्यांना द्यावेच लागेल, असे संचालक लक्ष्मी पाटील म्हणाल्या. सभेत ९० टक्के सभागृह विरोधात होते, बोगस ताळेबंदाचे पितळ उघडे पडणार हे लक्षात आल्यानंतर सभा गुंडाळून त्याचे खापर विरोधकांवर फोडले; पण सभासद सुज्ञ व जाणते आहेत, ते योग्यवेळी उत्तर देतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बँकेचे संचालक सुरेश कोळी, अरुण पाटील, डी. जी. पाटील, सतीश बरगे, शंकर पोवार, तुषार पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)