शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बँकेवर पुन्हा समितीराज..!

By admin | Updated: April 27, 2015 00:16 IST

१३ जागांवर विजय : थोरात गटाला ८ जागा; शि. द. पाटील गट, परिवर्तन पॅनेलचा धुव्वा

सांगली : अत्यंत चुरशीने झालेल्या सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विश्वनाथ मिरजकर यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक समितीने वर्चस्व राखले. २१ पैकी १३ जागांवर विजय संपादन करीत समितीने संभाजीराव थोरात गटाचा पराभव केला. या निवडणुकीत थोरात गटाला ८ जागांवर समाधान मानावे लागले, तर शिक्षक संघाचे नेते शिवाजीराव पाटील, परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडाला. बँकेचे माजी अध्यक्ष सतीश पाटील, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब अनुसे, समितीचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी यांना पराभवाचा धक्का बसला. शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी चौरंगी लढत झाली. या निवडणुकीसाठी शनिवारी ९७ टक्के मतदान झाले होते. रविवारी सकाळी येथील तरुण भारत क्रीडांगणाच्या हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. बारा वाजेपर्यंत मतांचे गठ्ठे बांधण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात झाली. दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी वाळवा सर्वसाधारण गटातील पहिला निकाल जाहीर करण्यात आला. या गटातून शिक्षक समितीचे रमेश पाटील व थोरात गटाचे सुधाकर पाटील विजयी झाले. त्यांना अनुक्रमे २०९८ व २१०८ मते मिळाली. या गटातून समितीचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील यांचा पराभव झाला. त्यांना १९०५ मते मिळाली, तर थोरात गटाचे संजय काटे यांना २०२५ मते मिळाली. या दोन्ही पराभूतांना क्रॉस व्होटिंगचा फटका बसला. मिरज सर्वसाधारण गटात समितीने दोन जागा राखल्या, तर एका जागेवर थोरात गटाला यश आले. या गटातून समितीचे श्रेणिक चौगुले (१९७५ मते), तुकाराम गायकवाड (२०३४), तर थोरात गटाचे शामगोंडा कुमगोंडा पाटील (२१२९) विजयी झाले. त्यांनी समितीचे महादेव पाटील (१८७७), थोरात गटाचे असिफ शेख (१९३१) व शिवानंद तेलसंग (१९०६) यांचा पराभव केला. तासगाव सर्वसाधारणमध्ये थोरात गटाचे अविनाश गुरव (२१५५) व समितीचे शिवाजी पवार (२१०२) विजयी झाले. त्यांनी समितीचे शब्बीर तांबोळी (१९३५) व थोरात गटाचे रघुनाथ थोरात (१७९०) यांचा पराभव केला. तीन तालुक्यातील निकालापर्यंत समितीचे चार व थोरात गटाचे तीन संचालक निवडून आले होते. या वेळेपर्यंतचा कल पाहता, कुणाची सत्ता येणार, याची उत्सुकता ताणली गेली होती. खानापूर सर्वसाधारणमध्ये थोरात गटाला मोठा धक्का बसला. बँकेचे माजी अध्यक्ष सतीश पाटील यांचा ६४ मतांनी पराभव झाला. पाटील यांना १९६१ मते मिळाली. या गटात समितीचे बाळासाहेब आडके (२०२५) व थोरात गटाचे सुनील गुरव (२१०८) विजयी झाले. आटपाडी सर्वसाधारणमधून समितीचे उत्तम जाधव (२२५७) यांनी थोरात गटाच्या अशोक मोटे (२०५५) यांचा पराभव करीत आघाडी घेतली. जत सर्वसाधारणमध्ये थोरात व समितीला प्रत्येकी एक जागा मिळाली. समितीचे राजाराम सावंत (२०२१) व थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे (२१७१) विजयी झाले. कडेगाव सर्वसाधारणमध्ये समितीचे महादेव माळी (२१९६) यांनी थोरात गटाचे धनंजय नरुले (२०९२) यांचा पराभव केला. कवठेमहांकाळमध्ये समितीचे शशिकांत बजबळे (२०५७) यांनी थोरात गटाचे विलास हाक्के (१९९०) यांचा ६७ मतांनी पराभव केला. पलूसमध्ये थोरात गटाने बाजी मारली. या गटाचे बाजीराव पाटील (२०१८) यांनी समितीचे धोंडीराम पिसे (१९५३) यांचा पराभव केला. शिराळ्यामध्ये समितीचे सदाशिव पाटील (२०८१) यांनी थोरात गटाचे प्रकाश जाधव यांचा (२०४०) अवघ्या ४१ मतांनी पराभव केला. सर्वसाधारण गटात समितीला १०, तर थोरात गटाला ६ जागा मिळाल्या. त्यामुळे राखीव गटातील ५ जागांच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. राखीव गटातही समितीने तीन जागांवर बाजी मारली. इतर मागास प्रवर्गातून समितीचे श्रीकांत माळी (२१३४) यांनी थोरात गटाचे फत्तू नदाफ (१९६०) यांचा पराभव केला. अनुसूचित जाती गटातून थोरात गटाचे महादेव हेगडे (२०७०) यांनी समितीचे देवानंद गोटखिंडे (१९७३) यांचा, तर विमुक्त जाती व भटक्या जमाती गटातून समितीचे हरिबा गावडे (२१३५) यांनी थोरात गटाचे विद्यमान संचालक बाळासाहेब अनुसे (१८९०) यांचा पराभव केला. महिला राखीव गटातील दोन जागांवर मोठी चुरस झाली. या गटातून समितीच्या अर्चना खटावकर (२१५१) व शोभा पाटील (१९९२) विजयी झाल्या. समितीच्या सुषमा देशमाने यांचा अवघ्या ३ मतांनी पराभव झाला. या निवडणुकीत समिती व थोरात गटात ४० ते ७० मतांचा फरक राहिला. शिक्षक संघाचे नेते शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील तरुण मंडळाच्या उमेदवारांना १३०० ते १५०० मते मिळाली, तर परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना २०० ते ३०० मते मिळाली. (वार्ताहर)कार्यकर्त्यांचा जल्लोषशिक्षक बँकेच्या निवडणुकीत चारही गटांनी चुरशीने प्रचार केला. एका-एका सभासदापर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणा राबविली. शनिवारी मतदानही चुरशीने झाले. रविवारी सकाळी येथील तरुण भारत क्रीडांगणाच्या हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळपासूनच चारही पॅनेलचे कार्यकर्ते गटा-गटाने दाखल होत होते. दुपारनंतर निकाल जसजसे हाती येऊ लागले, तसतसे थोरात व शि. द. पाटील गटाचे कार्यकर्ते गायब झाले आणि समितीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. सायंकाळपर्यंत निव्वळ जल्लोष सुरू होता.महिला राखीवमध्ये फेरमतमोजणीमहिला गटात समितीच्या सुषमा देशमाने यांनी थोरात गटाच्या शोभा पाटील यांचा ७ मतांनी पराभव केला होता. या निकालावर थोरात गटाने फेरमतमोजणीची मागणी केली. फेरमतमोजणीनंतर शोभा पाटील या एका मताने आघाडीवर गेल्या. त्याला पुन्हा समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. तीन टेबलांवर देशमाने यांच्या मतांमध्ये वाढ झाल्याचा दावा केला. जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. एस. एन. जाधव यांनी या तीन टेबलांवरील मतांची फेरमोजणी केली. या फेरीत शोभा पाटील या देशमाने यांच्यापेक्षा तीन मते अधिक मिळवून विजयी झाल्या. हे जिंकले, हे हरले...या निवडणुकीत थोरात गटातून विद्यमान संचालक विनायक शिंदे व अविनाश गुरव विजयी झाले, तर संचालक सतीश पाटील, बाळासाहेब अनुसे यांना पराभवाचा धक्का बसला. समितीचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष अजित पाटील हे दिग्गज पराभूत झाले.