शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
3
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
4
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
5
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
6
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
7
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
8
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
9
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
10
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
11
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
12
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
13
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
14
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
15
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
16
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
17
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
18
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
19
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

टीडीआरप्रश्नी टीकेची झोड उठणार

By admin | Updated: July 19, 2015 23:53 IST

आज महापालिका सभा : मार्केट, दुकानगाळे, स्मार्ट सिटी प्रकल्प यावर होणार चर्चा

कोल्हापूर : महापालिकेचे मार्केट दुकानगाळे हस्तांतरण करणे, मुदतवाढ व भाडे, स्मार्ट सिटी प्रकल्प, प्राथमिक शिक्षण मंडळाच्या शाळा पब्लिक पर्सनल पार्टनरशिप (पीपीपी) या तत्त्वावर खासगी संस्थांना देणे, आदी विषयांवर आज, सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. टीडीआरप्रश्नी गुन्हा दाखल झाल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठणार असल्याने सभा वादळी होण्याची शक्यता आहे. काही नगरसेवकांनी आजच्या सर्वसाधारण सभेत आरक्षण उठविण्याचा प्रस्ताव टाकल्याचे समजते. यावरून मोठे वादंग उठू शकते. तसेच केंद्र सरकारपुरस्कृत स्मार्ट सिटी प्रकल्पांंतर्गंत कोल्हापूर शहराचा समावेश व्हावा, प्राथमिक शिक्षण मंडळाच्या शाळा पीपीपी तत्त्वावर संस्थांना देण्याचा ठराव मंजुरीसाठी देण्यात आला आहे. हा ठराव मंजूर झाल्यास संबंधित संस्थेला ती शाळा २० वर्षे कराराने देण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या दोन किलोमीटर परिसरातील ४५ टक्के उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश देणे त्या संस्थेला बंधनकारक ठरणार आहे. या बदल्यात या संस्थांकडून मिळणारे पैसे हे प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन हे अन्य शाळांमधील भौतिक सुविधांवर खर्च करणार आहे. त्याचबरोबर साने गुरुजी वसाहतीतील क्रीडांगणासाठी आरक्षित जागेच्या टीडीआर प्रश्नावर प्रशासनाच्या विरोधात सभागृहात टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे.फरास यांचा गुरुवारी राजीनामाकोल्हापूर : महापालिकेचे स्थायी समिती सभापती आदिल फरास यांच्या राजीनाम्यावरून गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, ते गुरुवारी (दि. २३) सभापतिपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे उर्वरित कालावधीसाठी या पदासाठी राष्ट्रवादीत चढाओढ होणार आहे.२०१० साली झालेल्या निवडणुकीत सत्तेत एकत्रित आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी महापौर-उपमहापौर, स्थायी, परिवहन, प्राथमिक शिक्षण, महिला व बालकल्याण समिती अशी पदांची वाटणी केली होती. ‘स्थायी’च्या दोन्ही वेळेमध्ये सहा-सहा महिन्यांसाठी हे पद देण्याचे ठरले आहे. त्यामुळे आतापर्यंत गटनेते राजेश लाटकर, रमेश पोवार व त्यानंतर आदिल फरास यांना स्थायी समिती सभापतिपदाची संधी मिळाली आहे. सध्या राष्ट्रवादीचे स्थायी सदस्य ज्योत्स्ना मेढे-पवार, प्रकाश गवंडी व सर्जेराव पाटील हे आहेत. त्यापैकी मेढे-पवार यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरल्याने त्यांची निवड निश्चित आहे. त्यामुळे प्रकाश गवंडी व सर्जेराव पाटील या दोघांमध्ये स्थायी सभापतिपदासाठी रस्सीखेच असणार आहे. गवंडी हे सतत पक्षाच्या कामात सक्रिय असतात. त्यामुळे गवंडी यांचे नाव सभापतिपदासाठी निश्चित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. २३) फरास यांचा राजीनामा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे बैठक घेणार आहेत. त्या बैठकीमध्ये स्थायी सभापतिपदी कुणाची निवड होणार हे स्पष्ट होईल.