शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘टीडीआर’प्रश्नी लवकरच तोडगा निघेल

By admin | Updated: April 22, 2016 00:54 IST

सतेज पाटील : ‘क्रिडाई कोल्हापूर’तर्फे रस्त्यावरील झाडांना पाणी देण्याच्या उपक्रमाला प्रारंभ

कोल्हापूर : शहराच्या विकासासाठी शासनाच्या नवीन नियमानुसार सहा आणि साडेसात मीटरच्या रस्त्यांवरील बांधकामांना टीडीआर वापरण्यास परवानगी मिळाली पाहिजे. ‘टीडीआर’प्रश्नी लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री व नगरविकास खात्याच्या सचिवांची आम्ही भेट घेतली आहे. त्यामुळे लवकरच ‘टीडीआर’बाबत तोडगा निघेल, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी येथे दिली.शहरात ५० किलोमीटरच्या रस्त्यावरील झाडांना सांडपाण्यावर पुनर्रप्रक्रिया केलेले पाणी टँकरद्वारे घातले जात आहे. क्रिडाईच्या या उपक्रमाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठ-पोस्ट कार्यालय चौकातील बगीचाला आमदार पाटील यांच्या हस्ते पाणी घालण्यात आले. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, आयुक्त पी. शिवशंकर, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष महेश यादव प्रमुख उपस्थित होते.आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर शहर हे आपल्या सर्वांचे ब्रँड अ‍ॅम्बॅसडर असल्याने त्याला स्वच्छ-सुंदर करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. यंदा भीषण पाणीटंचाई आहे. पण, यातही शहरातील सांडपाण्यावर पुनर्रप्रक्रिया केलेले पाणी रस्त्यांवरील झाडांना देण्याचा क्रिडाई कोल्हापूरचा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा आहे.महापौर रामाणे म्हणाल्या, रस्त्यांवरील झाडांना पाणी देण्याचा उपक्रम राबवून क्रिडाई कोल्हापूरने महानगरपालिकेला मदतीचा हात दिला आहे. आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, क्रिडाई कोल्हापूरचा हा उपक्रम आदर्शवत ठरणारा आहे. या संघटनेप्रमाणे अन्य संघटनांनीही शहर विकासाला हातभार लावावा.यावेळी सभागृह नेता प्रवीण केसरकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगर रचनाचे सहायक संचालक धनंजय खोत, क्रिडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजीव परीख, क्रिडाई कोल्हापूरचे माजी अध्यक्ष राम पुरोहित, गिरीश रायबागे, विद्यमान उपाध्यक्ष सुजय होसमणी, खजानीस चेतन वसा, सदस्य नितीन जिरगे, विक्रांत जाधव, प्रमोद साळुंखे, हेमांग शहा, सत्यजित कापडे, संग्राम दळवी, पवन जमादार, विजय माणगांवकर, कृष्णा पाटील, प्रकाश मेडशिंगे, आदी उपस्थित होते. सचिव विद्यानंद बेडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)