शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

टस्कर दाजीपूर अभयारण्यात आश्रयाला

By admin | Updated: February 15, 2015 00:37 IST

ऊस, केळी पिकांचे नुकसान : परिसरात भीतीचे वातावरण; सतर्कतेचा इशारा

राधानगरी : राधानगरी तालुक्यातील भुदरगड हद्दीजवळच्या वाकीघोल परिसरात काल शुक्रवारी रात्री एका टस्कर हत्तीचे आगमन झाले. दुबळेवाडी येथील बाळू कृष्णा दळवी यांच्या शेतातील ऊस व केळीचे प्रचंड नुकसान करून सकाळी अभयारण्यात त्याने आश्रय घेतला. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर वनविभाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. भुदरगडमधील वासनोली, कारिवडे, बारमाचा सडा मार्गे आलेला टस्कर दुबळेवाडी येथील शेतात असल्याचे रात्री साडेअकरा वाजता लोकांच्या लक्षात आले. फटाके, ढोल यांचा आवाज करून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने दाद दिली नाही. रात्रभर दळवी यांच्या पिकांचा त्याने फडशा पाडला. या परिसरातच गस्तीसाठी फिरणारे विभागीय वनाधिकारी एल. एस. झुरे, वनक्षेत्रपाल एस. एस. पाटील, वनपाल अमोल शिंदे, जी. एस. काशिदकर, कर्मचारी बाळू केसरकर यांनी या ठिकाणी धाव घेऊन लोकांना शांत केले. शनिवारी सकाळी हा टस्कर जवळच्या राधानगरी अभयारण्यात शिरला. तो पुन्हा शेतवडीत व गावात परतण्याची शक्यता असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. वन्यजीव विभागाने या परिसरातील ग्रामपंचयतींना तसे कळवले असून, शेतात जाताना सावधानता बाळगावी, असा सल्ला दिला आहे. पाच वर्षांपूर्वी याच परिसरातून एका टस्कराचे आगमन झाले होते. तो थेट राधानगरी, हसणे परिसरात आला होता. याचवेळी एका वनमजुराला त्याने ठार केले होते. नंतर काही दिवसांनी काळम्मावाडी मार्गावरील जंगलात त्या हत्तीचा न्युमोनियाने मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी