शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून विशिष्ठ जाती-धर्मांच्या लोकांना लक्ष्य

By admin | Updated: October 27, 2015 00:05 IST

इचलकरंजी शहर कॉँग्रेसची टीका: समाजकंटकांवर कारवाई करा

इचलकरंजी : ‘सबका साथ सबका विकास’ असा नारा देणाऱ्या भाजपप्रणीत केंद्र सरकारकडून विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांना लक्ष्य केले जात आहे. हरियाणातील सुनपेड येथील दलित कुटुंबीयांची हत्या आणि दादरी येथील अखलाक या मुस्लिम व्यक्तीची हत्या त्याचेच द्योतक आहे. या दोन्ही घटनांना केंद्रातील सत्ताच जबाबदार आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनांची सखोल चौकशी करून समाजकंटकांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सोमवारी कॉँग्रेस समितीचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याकडे केली.शहर कॉँग्रेस समितीच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी जिरंगे यांची भेट घेतली. हरियाणा राज्यातील वल्लभगड-सुनपेड या गावातील एका दलित कुटुंबाला घरात कोंडून घर पेटवून देत त्यांना जाळून ठार मारण्यात आले. तर दादरी परिसरातील बिसहडा गावातील अखलाक नामक व्यक्तीची गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून ठेचून हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांचा शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने तीव्र निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.याप्रसंगी नगरसेवक शशांक बावचकर, रवी रजपुते, संजय केंगार, आदिवासी संघटनेचे मोहन काळे, आदींनी सरकारवर टीका केली. यावेळी उपनगराध्यक्ष रणजित जाधव, सतीश डाळ्या, धोंडिलाल शिरगावे, अहमद मुजावर, समीर शिरगावे, कबनूरचे ग्रामपंचायत सदस्य कुमार कांबळे, नगरसेवक अब्राहम आवळे, रत्नप्रभा भागवत, अमर कांबळे, के. के. कांबळे, महावीर कुरुंदवाडे, श्रीकांत कोरवी, रंगा लाखे, अजित मिणेकर, रमेश पाटील, आनंदा कोरे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)