शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

‘९ आॅगस्ट, मुंबई लक्ष्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाचा जयघोष तसेच एक मराठा...लाख मराठा... ‘९ आॅगस्ट, मुंबई लक्ष्य’... मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे... अशा घोषणांनी रविवारी शहर परिसर दणाणून गेला. मुंबईत बुधवारी (दि. ९) निघणाºया मराठा महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा मावळा व रणरागिणींच्यावतीने शहरात मोटारसायकल रॅली ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाचा जयघोष तसेच एक मराठा...लाख मराठा... ‘९ आॅगस्ट, मुंबई लक्ष्य’... मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे... अशा घोषणांनी रविवारी शहर परिसर दणाणून गेला. मुंबईत बुधवारी (दि. ९) निघणाºया मराठा महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा मावळा व रणरागिणींच्यावतीने शहरात मोटारसायकल रॅली काढून या मोर्चात कोल्हापूरकरांनी सहभागी होण्यासाठी जनजागृती केली.सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे संदीप पाटील यांनी शिस्तबद्ध रॅली काढून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ दिली. त्यानंतर छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे यांच्या पुतळ्यांचे पूजन होऊन रॅलीला सुरुवात झाली. रॅलीच्या पुढे छत्रपती शंभूराजे यांचा खुल्या जीपवर बसविलेला पुतळा, तर त्या पाठीमागे मोटारसायकलवर असलेले मराठा मावळे व रणरागिणी होत्या.चौकाचौकांत या रॅलीमध्ये मराठा बांधव सहभागी होत होते. दरम्यान, निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी पुतळा, दसरा चौकातील शाहू पुतळा, ताराराणी चौकातील महाराणी ताराराणींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रमुख मार्गावरून जनजागृती करून शिवाजी चौक येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुंबईचा मराठा क्रांती महामोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.‘शिवानीं’चा आवाज बुलंद‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत रॅलीतून शिवानी शिंदे व शिवानी जाधव या रणरागिणींनी सकल मराठ्यांचा आवाज बुलंद केला. त्यांच्या आवेशाने रॅलीतील वातावरण द्विगुणित झाले.प्रमुख शिलेदार....राजू सावंत, जयेश कदम, शाहीर दिलीप सावंत, श्रीकांत भोसले, फत्तेसिंह सावंत, संदीप पाटील, उमेश पोवार, स्वप्निल पार्टे, संग्रामसिंह निकम, सुरेश जरग, संपतराव चव्हाण-पाटील, उदय जगताप, संग्रामसिंह गायकवाड, किशोर घाटगे, शिवानी जाधव, शिवानी शिंदे, संग्राम निकम, फिरोज उस्ताद, हृषीकेश तोरस्कर, विनय कोरवी, स्वप्निल जाधव, श्रीनिवास नारंगीकर, अमर पाटील, नंदू झेंडे, महेश बी. पाटील, गणी आजरेकर, राजू लिंग्रज, वसंतराव मेथे, शिरीष जाधव, अमरसिंह दळवी, प्रवीण राजगिरे, आशुतोष खराडे, सत्यजित पाटील, प्रथमेश देवकर, विश्वास कार्वेकर, अभिषेक पाटील, नागेश पोवार, आदी उपस्थित होते.शिस्तबद्ध रॅली अन् उत्साहशिवाजी मंदिर येथून दुचाकी रॅलीला प्रारंभ झाला. ही रॅली अर्धा शिवाजी पुतळा, कोल्हापूर हायस्कूल, खरी कॉर्नर, पद्माराजे हायस्कूल, नाथा गोळे तालीम, नंगीवाली तालीम, शाहू बँक, कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गवळी गल्ली, भगतसिंग तरुण मंडळ, टाऊन हॉल उद्यान, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, रेल्वे स्टेशन, दाभोळकर चौक, ताराराणी चौक, स्टार बझार, टाकाळा, कमला कॉलेज, राजारामपुरी बसस्टॉप, १२वी गल्ली, मेन रोड, जनता बाजार, बागल चौक, पार्वती चित्रमंदिर, उमा चित्रमंदिर, सुभाष रोड, अयोध्या चित्रमंदिर, बिंदू चौक मार्गे शिवाजी महाराज चौक येथे येऊन सांगता झाली. रॅलीमध्ये मोठ्या संख्यने सकल मराठा समाज सहभागी होऊनसुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली काढण्यात आली.