शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

‘ताराराणी’ला ‘मटका’ चिन्हच योग्य : गोऱ्हे

By admin | Updated: October 19, 2015 00:45 IST

जोरदार टीकास्त्र : असत्याच्या समर्थनासाठी श्रीकृष्णाचे उदाहरण अयोग्य

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी ताराराणी आघाडीला काही ठिकाणी ‘कपबशी’ चिन्ह मिळाले आहे. या आघाडीच्या उमेदवारांची आणि नेत्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना ‘कपबशी’ चिन्हाऐवजी ‘मटका’ चिन्ह मिळाले असते तर बरे झाले असते. कारण त्यांचा कारभार जगजाहीर आहे, असा उपरोधिक टोला शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी लगावला. श्रीकृष्णाचे उदाहरण देऊन असत्य गोष्टींचे समर्थन करायचे, हे योग्य नाही, अशी अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे नाव न घेता रविवारी पत्रकार परिषदेत केली. आमदार गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेमुळेच सरकार बहुमतात व स्थिर असल्याने कोल्हापूरच्या विकासाला चालना देण्यासाठी आमचाही हातभार राहणार आहे. महापालिका निवडणुकीत टोल लादणारे सत्ताधारी हेच आमचे प्रथम क्रमांकाचे शत्रू आहेत. आम्ही निवडणुकीपुरता नाही, तर वचनपूर्तीप्रमाणे ‘टोल बंद’ करणारच आहोत. ते आमचे कर्तव्य आहे. सांडपाणी, शहराची स्वच्छता, शौचालये, आदी मूलभूत प्रश्नांची अवस्था दयनीय आहे. यासाठी सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षच जबाबदार आहेत. त्याचबरोबर सांडपाणी, पंचगंगा प्रदूषण, अस्वच्छता अशा समस्यांची सोडवणूक होण्याआधी ‘स्मार्ट सिटी’ची चर्चा चुकीची आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या पद्धतीने पक्ष वाढविण्याचा अधिकार व स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आम्हीही भाजपला याबाबत विचारणार नाही. त्यामुळे त्यांनीही आमच्याकडे स्पष्टीकरण मागू नये. शिवसेना-भाजपमध्ये कुरबुरीमुळे अस्वस्थता असल्याची चर्चा आहे; परंतु आमच्यातील अस्वस्थतेचा गैरफायदा कुणा दुसऱ्याला होईल, एवढे भोळसट आम्ही निश्चित नाही. त्याबाबत शिवसेना एकदम सावध आहे.त्या पुढे म्हणाल्या, कोल्हापूर हे एक वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे. त्यामुळे या शहराची जुनी ओळख ठेवूनच हे शहर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी पाठपुरावा सुुरू आहे. शिवसेनेचे धोरण स्पष्ट आणि रोखठोक आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी बारामतीत येऊन शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली म्हणजे त्याचा दुसरा अर्थ घेणे चुकीचे आहे. शिवसेना-भाजपच्या सरकारबद्दल काळजी करण्यासारखे काही नाही. ते पाच वर्षे टिकेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नी योग्य धोरण सरकारने आखले असते तर आता आंदोलनाची वेळ आली नसती. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘ताराराणी’च्या नगरसेवकांचा व्यवहार जगजाहीरताराराणी आघाडीच्या नगरसेवकांचा यापूर्वीचा कारभार हा जगजाहीरच आहे; त्यामुळे त्यांच्याकडून आणखी वेगळी अपेक्षा काय करणार? असा टोला आमदार गोऱ्हे यांनी लगावला. यावेळी त्यांनी ताराराणी आघाडीच्या काळात अनेक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.