शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दिसलेपणाऐवजी असलेपणातून सिद्ध व्हावे : तारा भवाळकर- इचलकरंजीत ‘माध्यमातील स्त्रिया’ या विषयावर परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 23:05 IST

इचलकरंजी : महिलांनी आपल्या दिसलेपणातून नव्हे, तर असलेपणातून सिद्ध व्हावे. कशाचा अभिमान बाळगायचा आणि कशाचा न्यूनगंड बाळगायचा, हे आपण ठरविल्याशिवाय

इचलकरंजी : महिलांनी आपल्या दिसलेपणातून नव्हे, तर असलेपणातून सिद्ध व्हावे. कशाचा अभिमान बाळगायचा आणि कशाचा न्यूनगंड बाळगायचा, हे आपण ठरविल्याशिवाय माध्यमातून केले जाणारे महिलांचे वस्तूकरण थांबणार नाही, असे मत ज्येष्ठ विचारवंत लेखिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.

येथील समाजवादी प्रबोधिनी आणि श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ‘माध्यमातील स्त्रिया’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. यावेळी शशांक बावचकर, सौदामिनी कुलकर्णी, सौरभ मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उषाताई पत्की यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या परिसंवादात प्रा. डॉ. त्रिशला कदम यांनी जाहिरात व चित्रपटातील स्त्रिया, ज्येष्ठ लेखिका निलम माणगावे यांनी मालिकेतील स्त्रिया या विषयावर मांडणी केली. मानवी जीवनासाठी मनाचा नितळपणा व भूमिकेचा स्वच्छपणा आवश्यक असतो. कुटुंब व्यवस्थेत मित्रत्वाचे नाते महत्त्वाचे असते. मात्र, माध्यमांनी मनोरंजन व घडीभराची करमणूक या नावाखाली यामध्ये फार उथळपणा आणला आहे. तरुणींनी या माध्यमांचा गुलाम अथवा व्यसनी बनू नये, असा आशय वक्त्यांनी सविस्तर मांडला. प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. संगीता पाटील यांनी आभार मानले.इचलकरंजीत आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात ‘माध्यमातील स्त्रिया’ या विषयावर प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सौदामिनी कुलकर्णी, उषाताई पत्की, निलम माणगावे, प्राचार्य अनिल पाटील, प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर, आदी उपस्थित होते.