शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नळ योजना, रस्त्यांची कामे पालिका करणार

By admin | Updated: May 25, 2016 01:11 IST

इचलकरंजी सभेत प्रस्ताव मंजूर : आरोप-प्रत्यारोप, गदारोळ; दारू दुकानावरून नगराध्यक्षा-जाधव यांच्यात वाद

इचलकरंजी : आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चकमक आणि त्यातून उडालेला गोंधळ यामुळे मंगळवारी झालेली नगरपालिकेची सर्वसाधारण सभा चांगलीच रंगली. अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, कृष्णा नळ पाणी योजनेची दाबनलिका बदलण्याचे २७ कोटी रुपये खर्चाचे काम आणि १५ कोटी रुपयांची रस्त्याची कामे जीवन प्राधिकरण व शासनाच्या बांधकाम खात्याऐवजी नगरपालिकेने करावीत, असा राष्ट्रीय कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने दिलेला प्रस्ताव बहुमताने संमत करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे होत्या.नगराध्यक्ष बिरंजे यांनी ३२ विषयांवर मंगळवारी पालिकेची सभा आयोजित केली होती. सभेच्या सुरुवातीलाच सभागृहातील दोन्ही कॉँग्रेस व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी वेगवेगळे लक्ष्यवेधी प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे सुरुवातीलाच दीड तास सभेसमोरील विषयांवर कामकाज चालले नाही. लक्ष्यवेधी उपस्थित करताना गेल्या पंधरा सभांचे इतिवृत्त लिहिले गेलेले नाही, याबाबत नगरसेवक शशांक बावचकर यांनी विविध प्रश्न विचारले. तसेच नगररचनाकार प्रशांत राजे हे वारंवार गैरहजर राहत असल्याने पालिकेतील अनेक कामे अडून पडली आहेत. तरी त्यांची बदली करून त्यांच्याऐवजी इचलकरंजी पालिकेकडे सक्षम अधिकारी नेमावा, असाही प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आला. नगरसेवक बाळासाहेब कलागते यांनी डेंग्यूमुळे गावभागातील चार नागरिक दगावल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी मात्र कॉँग्रेस व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.दरम्यान, शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी शिवाजीनगर परिसरातील दारू दुकान बंद करण्याचा प्रश्न उपस्थित केला. त्याला हा विषय सभेसमोर घेता येत नाही, असे म्हणून दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला, तर नगराध्यक्षांच्या विभागातील दुकान असल्याने याबाबत नगराध्यक्षांनी निवेदन करावे, असा आग्रह जाधव यांनी धरला. त्यावर बोलताना नगराध्यक्ष बिरंजे यांनी या दुकानाबाबत गेल्या कित्येक वर्षांत अनुचित प्रकार घडलेला नाही. मात्र, आंदोलनकर्त्या मोजक्याच महिलांकडून यामध्ये राजकारण केले जात आहे, अशी टीका नगराध्यक्षांनी केली. त्यावर अजित जाधव यांनी नगराध्यक्षांना तुमचा दारू दुकानाला पाठिंबा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी दोन्ही कॉँग्रेसचे नगरसेवक रवी रजपुते, बाळासाहेब कलागते, अशोकराव जांभळे, शशांक बावचकर, आदींनी नगराध्यक्षांची पाठराखण केली आणि हा विषय आता चर्चेला घेता येणार नाही, असे ठामपणे सांगितले.कृष्णा नळ पाणी योजनेकडील दाबनलिका बदलण्याच्या कामाविषयी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला आवश्यक असलेले एक कोटी ३५ लाख ९५ हजार रुपयांचे सेवा शुल्क वर्ग करण्याच्या विषयावर सभागृहातील दोन्ही काँग्रेसबरोबर ‘शविआ’च्या नगरसेवकांनी मतप्रदर्शन केले. या चर्चेत कलागते, रजपुते, बावचकर, रणजित जाधव, अजित जाधव, भाऊसाहेब आवळे, अशोकराव जांभळे, महादेव गौड, तानाजी पोवार, मदन झोरे यांनी जोरदारपणे विचार मांडले. यावेळी आरोप-प्रत्यारोप होत असताना राजकीय कलगीतुरा रंगला. अखेर कृष्णा नळ पाणी योजनेकडील दाबनलिका बदलण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाऐवजी नगरपालिकेने आणि शहरअंतर्गत पंधरा कोटींचे रस्ते शासनाच्या बांधकाम खात्याकडून करून घेण्याऐवजी नगरपालिकेने स्वत: करावेत, असा कॉँग्रेस व राष्ट्रवादीने दिलेला प्रस्ताव ३४ विरुद्ध ९ मतांनी मंजूर करण्यात आला. (प्रतिनिधी) व्हीपमुळे ‘त्यांचे’ मतदान प्रस्तावालाडिजिटल फलक मुक्त शहर शहरात विविध ठिकाणी लावण्यात येणाऱ्या डिजिटल फलकांमुळे विद्रुपीकरण होत आहे. तरी नगरपालिका व शासकीय फलक यांच्याव्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी असलेले आणि रस्ता दुभाजकावर लावलेले सर्व फलक काढून टाकण्याचा महत्त्वपूर्ण ठराव या सभेत मंजूर झाला. त्यामुळे पालिकेला मात्र २२ लाख रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे.