शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईचे बोला, अन्यथा कोंडून घालू

By admin | Updated: March 20, 2015 23:41 IST

पंचगंगा प्रदूषण प्रश्न : बैठकीत इशारा, कारवाईवर सकारात्मक चर्चा, अधिकारी धारेवर

कोल्हापूूर : पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर काय कारवाई करणार ते बोला, खुलासा नको, अन्यथा कुलूप आणले आहे. तुम्हाला कोंडून घालू, असा इशारा शुक्रवारी स्वाभिमानी युवा आघाडी व पर्यावणप्रेमींनी दिला. त्यानंतर पुढील बैठकीत कारवाईचा अहवाल दिला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी त्वरीत उपाययोजना व दोषींवर कारवाई यासंबंधी शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी अधिकारी गैरहजर होते. त्यावर सुरुवातीला जोरदार आक्षेप घेतला. प्रदूषणासंबंधित जिल्हा प्रशासनाला गांभीर्य नसेल तर बैठक का आयोजित केली, असा प्रश्न ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी उपस्थित केला. जोपर्यंत सर्वच विभागाचे सक्षम अधिकारी येणार नाहीत तोपर्यंत बैठक सुरू होणार नाही, असा पवित्रा साऱ्यांनीच घेतला. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांनी मोबाईलवरून जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. बैठकीला सुरुवात झाली. ‘स्वाभिमानी’चे युवा अध्यक्ष बंडू पाटील यांनी व्यासपीठावर बसलेले सर्वच प्रदूषणाला दोषी असून, चोर आहेत, असा थेट आरोप केला. पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई काय करणार, हे स्पष्ट करावे, अशी मागणी लावून धरली. त्याला साऱ्यांनी पाठिंबा दिला. पंचतारांकित वसाहतीतील दूषित पाण्यामुळे पंचगंगा प्रदूषित होत असल्याचे बंडू पाटील, संदीप बुधवले यांनी निदर्शनास आणून दिले. औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी के. एस. भांडेकर यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिवसेनेचे विजय देवणे यांनी आधी माहिती घ्या आणि नंतर बोला, अशी समज दिली. ते म्हणाले, भोगावती, कुंभी, दालमिया, रेणुका, राजाराम हे साखर कारखाने मळीमिश्रीत पाणी नदीत सोडत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी. कुठे आहेत जिल्हाधिकारी ?‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली. प्रदूषणावर १५ वर्षांपासून लढत आहे. उच्च न्यायालयात गेलो आहे. अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. बैठकीला गैरहजर राहणारे जिल्हाधिकारी कुठे आहेत, असा सवाल दिलीप देसाई यांनी केला. न्यायालयाचा अवमानइचलकरंजी नगरपालिकेने प्रदूषणप्रश्नी उच्च न्यायालयातील सुनावणीत दूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळत नाही, असे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. शुक्रवारी सकाळी थेट दूषित पाणी पंचगंगेत मिसळत असल्याची क्लीप माझ्याकडे आहे. त्यामुळे इचलकरंजी मुख्याधिकाऱ्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे, असा आरोप बंडू पाटील यांनी केला. इचलकरंजीतील प्रदूषित कारखान्यांचा सर्व्हे होणार बैठकीत निर्णय : ‘प्रदूषण’, नगरपालिका, ‘औद्योगिक’ संयुक्त मोहीम राबवणारकोल्हापूर : इचलकरंजी शहरातील कपड्यांवर विविध प्र्रकारे प्रक्रिया करणारे उद्योग किती आहेत. कोणत्या उद्योगांकडून प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता बाहेर सोडले जाते यांचा सर्व्हे तीन ते चार दिवसांत प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ, नगरपालिका, वीजवितरण कंपनी यांनी संयुक्तपणे करण्याचा निर्णय झाला. पाटबंधारे विभागाने नदीकाठावरील शेतकऱ्यांची पाणीपट्टी पाटबंधारे विभागाने मागू नये, आम्ही देणार नाही. पावसाळ्यात पुराचा आणि उन्हाळ््यात प्रदूषित पाण्याची समस्या शिरोळ तालुक्यात निर्माण होत आहे. त्यामुळे शिरोळ तालुका आपत्तीग्रस्त म्हणून जाहीर करा, असे बंडू पाटील यांनी मागणी केली. मुख्याधिकारी पवार यांनी प्रदूषण करणारे निदर्शनास आल्यास कारवाई केली जात आहे. साईदीप इंडस्ट्रीजचे दूषित पाणी पंचगंगेत मिसळत असल्याची माहिती घेतो, असे सांगितले. डोके म्हणाले, सायझिंग व अन्य उद्योग यांचा सर्व्हे करण्यासाठी मोहीम राबविली जाईल. प्रांताधिकारी पाटील म्हणाले, उद्योग चालवून कोणीही उपकार करत नाहीत. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करावी. ...तर ‘एव्हीएच’सारखी अवस्था होईलप्रदूषणकारी घटक बाहेर सोडणाऱ्या कोणत्याही प्रकल्पांना परवाना देऊ नये. क्षमतेपेक्षा अधिक गाळप केल्यानंतर बाहेर पडणारे दूषित पाणी नदीत किंवा ओढ्यावर कारखाने सोडत असतात. त्यामुळे गाळप परवाना देतानाच प्रक्रिया प्रकल्प सक्षम आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. अन्यथा आता लोक शांत बसणार नाहीत. ‘एव्हीएच’सारखी अवस्था करतील, असा इशारा गायकवाड यांनी दिला.