शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रुपयाचे बिलही बॅँकेतूनच घ्या; सरकारच्या अनुदानासाठी ‘गोकुळ’चा संस्थांना फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:39 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी ‘गोकुळ’ने गाय दूध उत्पादकांचे दहा दिवसांचे संपूर्ण ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी ‘गोकुळ’ने गाय दूध उत्पादकांचे दहा दिवसांचे संपूर्ण बिल थेट दूध उत्पादकाच्या बॅँक खात्यात वर्ग करण्याचा फतवा काढला आहे. रुपया जरी बिल रोखीने निघाले, तरी ते बॅँकेतूनच मिळणार असल्याने दूध उत्पादकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आठ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणात चलनटंचाई जाणवू लागली. चलनटंचाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहाराची सक्ती केली. या निर्णयाचे लोन थेट दूध उत्पादकांपर्यंत पोहोचले. दुग्ध विभागाने संस्थांवर कॅशलेसबाबत दबाव टाकल्यानंतर संस्थांनी उत्पादकांचे १0 दिवसाला होणारे बिल संस्थेत न देता, बॅँकेचा धनादेश देण्यास सुरुवात केली. आता गाय दूध उत्पादकांचे १0 दिवसांचे संकलन, बिलाची माहिती आॅनलाईन मागवली आहे. संपूर्ण बिल बॅँकेतच जमा करण्याचा फतवा काढला आहे.गाय दूध अनुदान योजनेत काही खासगी दूध संघ मखलाशी करत आहेत. उत्पादकांकडून कमी दराने दूध खरेदी करून सरकारचे अनुदान लाटत असल्याचा संशय दुग्ध विभागाला आहे; त्यामुळे गाय दूध उत्पादकाने घातलेले दूध, त्याला मिळालेले पैसे, याची माहिती संघाकडे मागितली आहे. ‘गोकुळ’ने प्राथमिक दूध संस्थांना तसा फॉरमॅट देऊन महिन्याच्या २, १२, २२ या तारखेला माहिती आॅनलाईन पाठविण्याचा आदेश दिला आहे. दूध संस्थांनी गाय दूध उत्पादकांची बॅँक खात्यांची माहिती संकलन सुरू केले आहे. मुळात दूध अ‍ॅडव्हान्स, पशुखाद्यासह इतर कपाती होऊन १0 दिवसांच्या बिलातून जेमतेम पन्नास, शंभर रुपये उत्पादकाला रोखीला निघतात. तेही पैसे आता बॅँकेतच घ्या, असा फतवा ‘गोकुळ’ने काढला आहे.जिल्ह्यात आजही दुर्गम वाड्यावस्त्यांवर बॅँका दूरच, पण साधी वाहतूक व्यवस्था नाही. तेथील उत्पादकांना दुधाचा रुपया आणण्यासाठी पाच-दहा किलोमीटर पायपीट करत बॅँकेत जावे लागणार आहे. ११ वाजता बॅँका उघडल्यानंतर तासभर रांगेत थांबावे लागणार आहे. २0-३0 रुपये बिलासाठी दिवसभराचा रोजगार बुडवून शेतकºयांना बॅँकेत तिस्टत बसावे लागणार असल्याने संताप व्यक्त होत आहे.कॅशलेस नव्हे, मनस्ताप...संस्थेत मिळणारे पैसे बॅँकेतून घेणे, याला कॅशलेस म्हणायचे काय? असा सवाल शेतकºयांमधून केला जात आहे. अडचणीच्या वेळी रात्री-अपरात्री दुधापोटी संस्थेतून मिळणारे पैसे बंद करून दूध संघ व सरकार नेमके काय साधत आहे. कॅशलेसचा उद्देश सफल होत नाहीच, पण यातून शेतकºयांचा मनस्ताप मात्र वाढविला आहे.