शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
4
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
5
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
6
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
7
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
8
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
9
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
10
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
11
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
12
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
13
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
14
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
15
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
16
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
17
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
18
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
19
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
20
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते

कोल्हापुरात फेरआरक्षण टाका

By admin | Updated: July 6, 2016 01:10 IST

--अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : शिवसेना--पर्चेस नोटीस प्रकरण --उपायुक्तांकडे मागणी

कोल्हापूर : पर्चेस नोटिसीची प्रक्रिया जाणीवपूर्वक विलंबाने राबविल्यामुळे महापालिकेच्या ताब्यातून सुटलेल्या सर्व जागांवर फेरआरक्षण टाकावे आणि महापालिकेच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेनेने मंगळवारी महापालिकेकडे केली. याचवेळी सेफ सिटी प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे ठरल्यामुळे शहराच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशीही मागणी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा तसेच शहर शिवसेना शाखेचे एक शिष्टमंडळ मंगळवारी महानगरपालिका उपायुक्त विजय खोराटे यांना भेटले आणि पर्चेस नोटीस देऊन सोडविलेल्या आरक्षणाच्या जागा आणि सेफ सिटी प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत चर्चा केली. जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.भ्रष्टाचाराचा परिपाक म्हणजे पर्चेस नोटीस देऊन आरक्षण उठविणे होय. या प्रकरणात पाच लोकांनी ३५ कोटींचा आंबा पाडला. त्यामुळे महानगरपालिकेच्या सभागृहाची बदनामी होत आहे. जर ही मलिन प्रतिमा सुधारायची असेल तर प्रशासनाने आतापर्यंत सुटलेल्या सर्व जागांवर फेरआरक्षण टाकावे. तसा प्रस्ताव महासभेकडे मंजुरीकरिता पाठवावा; तसेच ज्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे या जागा आरक्षणातून वगळल्या गेल्या, त्या सर्वांवर फौजदारी दाखल करावी, असे पवार म्हणाले. आरक्षणातील जागा लाटण्यासाठी नियोजनपूर्वक टाकलेला हा दरोडा असल्याचा आरोप पवार यांनी केला. सेफ सिटी प्रकल्पातील भ्रष्टाचार हा शहराच्या सुरक्षेशी संबंधित विषय असल्याने संबंधित ठेकेदारास बिल देण्यात येऊ नये, अशी मागणी कमलाकर जगदाळे यांनी केली. चार महिन्यांतच या प्रकल्पाची कार्यक्षमता स्पष्ट झाली. काम देण्यापूर्वी ठेकेदार कोण आहे, त्याची पात्रता काय आहे, कसले कॅमेरे बसविले आहेत याची तपासणी अधिकाऱ्यांनी का केली नाही? अशी विचारणा संजय पवार यांनी केली. वाहनांचे क्रमांक तसेच व्यक्तींचे चेहरे सुस्पष्ट दिसत नाहीत, कॅमेरे कमी दर्जाचे आहेत, अशी तक्रार हर्षल सुर्वे यांनी केली. या प्रकल्पात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे यांच्यात संगनमत झाल्याचा आरोप दुर्गेश लिंग्रस यांनी केला. शिष्टमंडळात रवी चौगुले, राजू जाधव, अवधूत साळोखे, राजू हुंबे, शशिकांत बीडकर, रणजित आयरेकर, राजेंद्र पाटील, रघुनाथ टिपुगडे, दिलीप देसाई, नरेश तुळशीकर, रफिक नायकवडी, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)चौकशी सुरू : घोटाळ्याबाबत कारवाई करुपर्चेस नोटीस घोटाळ्याची चौकशी प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. पर्चेस नोटीस आल्यापासून यासंबंधीच्या प्रस्तावांना कोठे विलंब झाला, त्याला जबाबदार कोण, याची माहिती घेण्यात येत आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्त विजय खोराटे यांनी सांगितले. तसेच महापालिकेच्या ताब्यातून गेलेल्या जागांवर फेरआरक्षण टाकण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.