शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

देवीचे दर्शन उद्या गर्भगाभाऱ्यातून घेऊ

By admin | Updated: April 10, 2016 01:05 IST

सुवर्णा तळेकर : अंबाबाई मंदिर गाभारा प्रवेशावरून उत्तर-प्रत्त्युत्तर

कोल्हापूर : अंबाबाईच्या गर्भकुडीत राजघराण्यातील स्त्रिया, पुजाऱ्याच्या कुटुंबातील स्त्रिया, पुजारी पुरुष व इतर पुरुष जात असतात. संविधानाने व कायद्याने दिलेल्या हक्कानुसार उद्या, सोमवारी देवीचे दर्शन थेट गाभाऱ्यात जाऊन घेऊ, असा इशारा स्त्री-पुरुष समता समिती व अंबाबाई भक्त मंडळाच्यावतीने निमंत्रक सुवर्णा तळेकर यांनी पत्रकाद्वारे शनिवारी दिला. अंबाबाईच्या दर्शनाला सर्वसामान्य महिलांना अटकाव केला जातो. मात्र, राजघराण्यातील स्त्रिया व पुजाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना व इतर पुरुष मंडळींना गर्भकुडीत प्रवेश दिला जातो. हा सरळ भेदभाव आहे. त्यामुळे आम्ही सोमवारी देवीच्या गर्भकुडीत जाऊन दर्शन घेऊ. या दर्शनासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अन्यथा उच्च न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली जाईल. याबाबत १ एप्रिलला उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक ५५/२०१६ मध्ये मुख्य न्यायमूर्ती डी. एच. वाघेला व न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांनी एक आदेश काढला आहे. या आदेशात सर्व मंदिरांत जिथे जिथे पुरुष जातील तिथे तिथे महिलांनाही जाण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर राज्याचे अ‍ॅटर्नी जनरल रोहित देव व सरकारी वकील ए. बी. वग्यानी यांनी संविधानातील या अनुच्छेदांचा व उपरोक्त कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे प्रतिज्ञापत्र या जनहित याचिकेत सादर केले आहे. त्यामुळे आम्हालाही देवीचे दर्शन गाभाऱ्यात जाऊन घेण्यास द्यावे, असे पत्रक सुवर्णा तळेकर, महिला फेडरेशनच्या मीना चव्हाण, अन्नपूर्णा महिला मंडळाच्या स्नेहल कांबळे, पानसरे विचार मंचच्या सीमा पाटील, रुपाली पाटील, अंबाबाई भक्त मंडळाच्या शरयू भोसले, समता संघर्ष समितीच्या प्रा. सुनीता अमृतसागर, सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, अतुल दिघे, चंद्रकांत यादव, जालिंदर जमादार, गिरीष फोंडे, मुकुंद कदम, धनाजी गुरव, अशोक जाधव, गौतम कांबळे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.