शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तरुणीला दोन दिवसांत हजर करा

By admin | Updated: May 15, 2016 00:48 IST

पोलिसांच्या नातेवाईकांना सूचना : तरुणीचा जबाब ठरणार महत्त्वपूर्ण; गुन्हा दाखल होऊ शकतो

कोल्हापूर : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या ‘त्या’ तरुणीला दोन दिवसांत पोलिसांसमोर हजर करण्याच्या सूचना तरुणीच्या नातेवाईकांना दिल्या आहेत. या नवदाम्पत्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी पोलिसांनी घेतली आहे. ती तरुणी समोर आल्यानंतर यामागचे गूढ उकलणार आहे. तसेच तरुणीचा जबाब नोंदविला जाणार आहे. त्यामध्ये तिने आपले जबरदस्तीने आई-वडील व नातेवाइकांनी अपहरण केल्याचे म्हटल्यास त्यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मातंग समाजातील मुलाने उच्च जातीतल्या तरुणीशी प्रेमविवाह केला. मुलीच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नसल्याने त्यांनी मुलीचे अपहरण केले. यासंबधी जुनाराजवाडा पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणाची पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार घेतली. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांचेही हात ओले केल्याच्या भीतीपोटी तरुणाने अप्पर पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांची भेट घेऊन न्याय मागितला. तरुणावर ओढवलेल्या अन्यायाविरोधात ‘लोकमत’ने आवाज उठविताच पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. दिवसभर या वृत्ताची जिल्ह्यात चर्चाही जोरदार झाली. अप्पर पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांनी पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांना याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन संबधित तरुणास न्याय देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार देशमुख यांनी तरुणीच्या नातेवाइकांशी तत्काळ संपर्क साधून दोन दिवसांत तिला पोलिसांसमोर हजर करण्याच्या सूचना केल्या. संबंधित तरुणी राजस्थानमध्ये आहे. तिच्यावर कुटुंबीयांचे दडपण आहे. पोलिसांसमोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर पडदा पडणार आहे. (प्रतिनिधी)