शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा घेवून जीवन सार्थक करा

By admin | Updated: January 10, 2017 00:23 IST

मानवाला जीवन जगत असताना कालपरत्वे टप्यातील विविध पात्रामधून मार्गक्रमण करीत जावे लागते.

ज्योतिप्रसाद सावंत-- आजरा --प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सिनेनाट्य अभिनेत्रींना अस्तित्व टिकविण्याकरिता करावा लागणारा संघर्ष, कारकिर्दीच्या उत्तरार्धात अभिनयापासून दुरावल्याने येणारे नैराश्य, एकाकीपणा आणि पुन्हा ‘अभिनय’ हेच त्यावरचे उत्तम औषध यावर टाकलेला प्रकाशझोत म्हणजे ‘एक्झिट’ हा नाट्यप्रयोग होय.नाटकाची सुरुवात एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या परंतु सध्या रंगमंचापासून दूर असणाऱ्या नाट्य अभिनेत्री देविका प्रधान यांच्या ‘गप्पांगण’ मधील मुलाखतीने होते. देविका यांचा रंगभूमीवरील प्रवेशच मूळचा अपघाताने झालेला असतो. गिरीश साळगावकर हा दिग्दर्शक रंगभूमीवर त्यांना ‘लिफ्ट’ देत असतानाच त्यांच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान, डॉ. प्रधान यांच्याशी देविकांचा विवाह झाल्याने डिवचला गेलेला गिरीश याच्या कुरापती चालूच राहतात. डॉ. प्रधान हे आत्महत्या करतात. डॉ. प्रधान यांचा मृत्यू आत्महत्या की हत्या याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊन वेगवेगळ्या चर्चा होऊ लागतात.गिरीश यांचे वागणे, डॉ. प्रधान यांचा मृत्यू देविकांना रंगमंचावरून बाजूला करून त्यांना नैराश्य व एकाकीपणाच्या खाईत लोटून देतात. त्यांचे अभिनयापासून दुरावणे त्यांच्या अभिनयाचा चाहता व कधीकाळी सहकलाकार म्हणून काम केलेल्या सारंगच्या पचनी पडत नाही. यातूनच तो डॉ. कारखानीस या प्रधान कुटुंबीयांच्या निकटवर्तीय मनोविकार तज्ज्ञाच्या मदतीने पुन्हा एकवेळ देविका यांना रंगमंचाची दारे खुली करून देतो. नैराश्य व एकाकीपणामुळे नाटकातून ‘एक्झिट’ घेतलेल्या देविका यांचा नाटकातील पुनर्प्रवेश नैराश्य व एकाकीपणातून ‘एक्झिट’ मिळवून देतो अशी या कथेची मध्यवर्ती कल्पना आहे.श्रीरंग रत्नागिरी यांनी सादर केलेल्या या नाटकाचे अरविंद लिमये यांनी लेखन केले आहे. भाग्येश खरे यांच्या दिग्दर्शनाला देविका प्रधान यांची भूमिका केलेल्या सुप्रिया उकीडवे यांनी केलेल्या अभिनयाने योग्य न्याय दिला आहे. निरंजनची गोपाळ जोशी यांची भूमिक यथोचित राजीव काणे यांनी पार पाडली आहे.आजरा येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय नाट्य महोत्सवातीत ‘एक्झिट’ या नाट्यप्रयोगातील एक क्षण.