शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूड गॅस एजन्सीवर कारवाई करा

By admin | Updated: August 31, 2014 23:40 IST

शिवसेनेची मागणी; तहसीलदारांना चौकशीचे आदेश

मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथील इण्डेन गॅस एजन्सीकडून ग्राहकांना व्यवस्थित गॅसपुरवठा होत नाही. गॅस ग्राहकांना नवीन नियम लावून वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या एजन्सीवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. देशपांडे यांनी कागल तहसीलदारांना या एजन्सीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.मुरगूडमध्ये इण्डेन गॅस या कंपनीची श्री बाळूमामा एजन्सी गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहे. स्थापनेपासून अगदी वेळेवर सेवा पुरविणाऱ्या या एजन्सीकडून गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक महिन्याला नवीन फतवा, नवीन नियम काढून ग्राहकांना हैराण केले आहे. सुरुवातीला २१ दिवस पूर्ण झाल्यानंतर लगेच सिलिंडर मिळत होते; पण काही महिन्यांपासून ३१ दिवस पूर्ण झाल्याशिवाय बुकिंग करून घेतले जात नाही. बुकिंगनंतर आठ दिवसांनी गॅसपुरवठा होतो. काही दिवसांपासून नवीन फंडा अंमलात आणला आहे. ग्राहकांनी कंपनीच्या नंबरवर आॅनलाईन बुकिंग करावे; त्याशिवाय आपल्याला सिलिंडर मिळणार नाही. या नियमामुळे शिक्षित लोकांची दमछाक होते; तर मग ज्यांच्याकडे मोबाईल नाही, अशा अशिक्षित ग्राहकांचे काय? या सर्वांमुळे कंपनीबाबत होत असलेल्या तक्रारीवरून शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हा उपप्रमुख संभाजीराव भोकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. देशपांडे यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. याप्रश्नी कागलचे तहसीलदार यांनी लक्ष घालून या एजन्सीच्या कारभाराची चौकशी करावी व अहवाल पाठवावा, असा स्पष्ट आदेश पुरवठा अधिकाऱ्यांनी कागल तहसीलदारांना दिला आहे.