शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बोगस संस्थांवर कारवाई करा

By admin | Updated: July 10, 2017 00:46 IST

बोगस संस्थांवर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्क सांगरूळ : ‘गोकुळ’च्या ठरावासाठी गावोगावी काढलेल्या बोगस संस्था व त्यांच्या नावावर इतर संस्थांचे दूध घालणाऱ्या संस्थांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक निवास वातकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. उत्पादकांना सर्वाधिक दर देत असल्याचा डांगोरा दूध संघ पिटत आहे, पण प्रत्यक्षात उत्पादकांच्या पदरात किती रुपये दर पडतो, याची पोलखोल आगामी काळात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारने म्हैस व गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांची वाढ करण्याचे आदेश दिले, पण ‘गोकुळ’ने शासनापेक्षा जादा दर असल्याचे कारण सांगत म्हैस दूध खरेदी दरात वाढ न करता गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ केली. देशात सर्वाधिक दर असल्याचा डांगोरा ‘गोकुळ’चे नेते पिटत आहेत, पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. संघाकडून दूध संस्थांना मिळणारा दर व संस्थांकडून उत्पादकांना मिळणारा दर असे ‘गोकुळ’कडून दोन दर दिले जातात. या दोन्ही दरात मोठी तफावत पाहावयास मिळते. इतर सुविधा, दिवाळीचा दर फरकाच्या माध्यमातून उत्पन्नातील ८१ टक्के उत्पादकांना देत असल्याचा दावा संघ करते; पण दिवाळी दर फरक जाहीर करायचा प्रतिलिटर सव्वादोन रुपये आणि त्यातील २५ पैसे संस्थांच्या नावावर डिबेंचर्स म्हणून कपात करून घेतली जाते. संस्थांना दिला जाणारा व्यवस्थापन खर्चही यामध्ये धरला जात असल्याने संघाचा ८१ टक्क्यांचा दावा चुकीचा असून उत्पन्नातील ५० ते ५० टक्केच वाटा प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात पडत असल्याचे निवास वातकर यांनी सांगितले. ‘गोकुळ’ ने प्राथमिक दूध संस्थांत होणारी स्थानिक दूध विक्री सक्तीने बंद केली. पण ठरावाच्या राजकारणासाठी काढलेल्या दूध संस्थांच्या नावावर राजरोसपणे दूध पाठविले जाते. एका-एका गावात पाच ते सहा संस्था अशाप्रकारच्या कार्यरत असून त्यांच्यावर कारवाई करावी. त्याचबरोबर दूध संघाने विक्री दरात वाढ केली तर खरेदी दरात आणखी दहा रूपयांची वाढ करावी, अशी मागणी वातकर यांनी केली. पत्रकार परिषदेवेळी कृष्णात खाडे, भरत खाडे, राहुल खाडे, जनार्दन खाडे, सुशांत नाळे, संभाजी नाले, सरदार खाडे, सचिन नाळे, संभाजी वातकर, सर्जेराव मगदूम, सुनील यादव उपस्थित होते. दर फरकात संस्थेकडून ढपला‘गोकुळ’ दि.२१ जूनपासून गाय दूध दर फरक ३ जुलैला संस्थांच्या नावावर वर्ग केले आहे; पण सांगरूळमधील हरहर महादेव दूध संस्थेने ३३ हजारांचा हा फरक उत्पादकांना दिलेलाच नाही. त्याचबरोबर वासरू संगोपन अनुदानाचे सुमारे ८० हजार रुपये दडपून ठेवण्याचा प्रताप केल्याचा आरोप वातकर यांनी केला.