शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: February 10, 2015 23:52 IST

शिवसेना : नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डोके यांच्याकडे मागणी

कोल्हापूर : विनाप्रक्रिया सांडपाणी पंचगंगा, कासारी, भोगावती नदीत व शेतात टँकरद्वारे अ‍ॅसिडयुक्त पाणी सोडणाऱ्या जबाबदार घटकांवर कारवाई कधी करणार, अशी मागणी मंगळवारी शिवसेनेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके यांच्याकडे केली. यावेळी जिल्हा उद्योग भवनासमोर कार्यकर्त्यांनी निदर्शने करत पंचगंगा, भोगावती, ताम्रपाणी, वेदगंगा नदी वाचवा अशी घोषणाबाजी केली.पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असलेल्या साखर कारखान्यांवर उच्च न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश दिले आहेत. त्याचबरोबर तशा सूचना दिल्या आहेत. तरीही, प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळेझाक करते आहे. हळदी (ता.करवीर) येथे भोगावती नदीत २२ डिसेंबर २०१४ ला मासे मृत झाले. याबाबत भोगावती साखर कारखाना व डिस्टलरीमधून तीन टँकर भरुन विनाप्रक्रिया सांडपाणी बाहेर पडले होते. त्याचबरोबर आसुर्ले-पोर्ले (ता.पन्हाळा) येथील दालमिया खासगी साखर कारखान्याने क्लिनिंगचे पाणी प्रक्रियेशिवाय थेट नाल्यात आल्याने कासारी नदीत मिसळले. त्यानंतर पुन्हा या कारखान्याने विनाप्रक्रिया सांडपाणी सोडले. परिणामी, या पाण्याचा पन्हाळा गावाला पुरवठा झाल्याची तक्रार झाली. ही वस्तुस्थिती खरी असल्याचे पन्हाळा व करवीर प्रांत यांच्या निदर्शनास आले. तसेच गत महिन्यात तेरवाड बंधारा (ता. शिरोळ) येथे पंचगंगा नदीत तर पाच दिवसांपूर्वी भोगावती नदीतील शेकडो मासे मृत झाले. त्यानंतर प्रदूषण मंडळ व उच्च न्यायालयाचे समिती सदस्य उदय गायकवाड यांनी संयुक्त पाहणी केली. त्यावेळी टँकरद्वारे अ‍ॅसिडयुक्त पाणी शेतात सोडल्याचे स्पष्ट झाले व ते पाणी नदीत मिसळले. त्यामुळे प्रदूषित घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी केली.पवार यांनी, या प्रश्नासंदर्भात पर्यटनमंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन अहवाल देणार असल्याचे डोके यांना सांगितले. त्यावर डोके यांनी, सर्व प्रांत, तहसीलदार, उच्च न्यायालय व प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमलेल्या समितीतील सदस्यांची सात दिवसांत संयुक्त बैठक बोलवतो, असे आश्वासन दिले. निदर्शनात दिलीप पाटील-कावणेकर, रवी चौगुले, सुजीत चव्हाण, बाजीराव पाटील, दत्ता टिपुगडे, राजू यादव, कमलाकर जगदाळे, दिलीप जाधव, शशी बिडकर, किरण माने, संदीप बिडकर, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीबाबत पत्रशिवसेनेने मंगळवारी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीबाबत पत्र दिले आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रदूषण रोखण्यासंदर्भात आजपर्यंत प्रांताधिकारी, तहसीलदार व प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी केलेल्या कारवाईबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलवावी, अशी मागणी प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके यांच्याकडे निदर्शनावेळी केली होती. त्यानुसार होळकर यांनी, पुढील आठवड्यातील सोयीची तारीख, वेळ द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे जिल्हाधिकारी प्रशासनाकडे केली आहे.