शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तपोवन, मानिनीच्या संचालकांवर कारवाई करा जिल्हा उपनिबंधकांचे आदेश : ‘सहा पतसंस्थांच्या अवसायक व वसुली अधिकाºयांची बैठकीत झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:52 IST

कोल्हापूर : मानिनी पतसंस्थेचे दप्तर नसताना कर्जवसुलीचे काम केलेच कसे? असा सवाल करीत संचालकांसह संबंधित यंत्रणेकडून दप्तर ताब्यात घ्या, दिले नाही तर त्यांच्यावर फौजदारी दाखल करा,

कोल्हापूर : मानिनी पतसंस्थेचे दप्तर नसताना कर्जवसुलीचे काम केलेच कसे? असा सवाल करीत संचालकांसह संबंधित यंत्रणेकडून दप्तर ताब्यात घ्या, दिले नाही तर त्यांच्यावर फौजदारी दाखल करा, असा आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी अवसायकांना दिला. सरकारी पॅकेजसाठी मालमत्ता तारण दिलेल्या तपोवन पतसंस्थेच्या संचालकांवरही कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

भुदरगड नागरी, मानिनी, तपोवनसह अवसायनातील पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या वेदना ‘लोकमत’ने ‘मरणयातना ठेवीदारांच्या’ यातून मांडल्या होत्या. त्याची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी मंगळवारी भुदरगड, मानिनी, तपोवन, राजीव, महाराष्टÑ नागरीसह सहा पतसंस्थांच्या अवसायक व वसुली अधिकाºयांची बैठक घेऊन झाडाझडती घेतली.

मानिनी पतसंस्थेवर दीड वर्षांपूर्वी अवसायक म्हणून एस. डी. चौगुले यांची नियुक्ती झाली; पण त्यांना दप्तर मिळालेले नाही. तरीही त्यांनी कर्जवसुलीचे काम केल्याचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्या निदर्शनास आले. ‘दप्तर नसताना कर्ज मिटवा-मिटवीची प्रकरणे कशी केली?’ अशी विचारणा काकडे यांनी केली. पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला या प्रक्रियेत घेऊन दप्तर ताब्यात घ्या. संचालक व संबंधित यंत्रणेकडून दप्तर मिळाले नाही, तर सहकार ‘कलम ८०’नुसार संचालकांवर फौजदारी दाखल करा, असे स्पष्ट आदेशही त्यांनी अवसायक चौगुले यांना दिले.

तपोवन पतसंस्थेची वसुली झालेलीच नाही. चार हजार थकबाकीदारांकडे सुमारे पावणेतीन कोटींची वसुली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक थकबाकीदारांकडे अत्यल्प रक्कम आहे. संबंधितांकडे जाऊन वसुलीसाठी प्रयत्न करा.वसुलीसाठी अवसायकांनी यंत्रणा उभी करून त्याचा पाठलाग करा, त्या वसुलीतून ठेवीदारांचे पैसे देण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक काकडे यांनी अवसायकांना केल्या. राज्य सरकारने पतसंस्थांना पॅकेज दिले होते.

‘तपोवन’च्या संचालकांनी आपली मालमत्ता तारण देऊन सरकारकडून पैसे घेतलेले आहेत; पण पॅकेजची परतफेड केलेली नाही. त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश काकडे यांनी संबंधितांना दिले.

भाडे दिले नाही म्हणून वाहनधारक पतसंस्थेचे दप्तर संबंधित मालकाने दिले नसल्याचे अवसायकांनी सांगितले. यावर त्यांच्याशी चर्चा करून दप्तर ताब्यात घेऊन वसुलीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. राजीव नागरी, महाराष्टÑ नागरी पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावाही घेण्यात आला.पंधरा दिवसाला द्यावा लागणार अहवालवर्ष-दीड वर्षे झाले तरी कर्जवसुली व ठेवपरतीचा आढावा उपनिबंधकांकडून घेतला जात नाही. ही गंभीर बाब असून दर पंधरवड्याला उपनिबंधकांनी या संबंधीचा आढावा घेऊन अहवाल पाठविण्याचे आदेशही अरुण काकडे यांनी दिले.अवसायक व वसुली अधिकाºयांची बैठक घेऊन त्यांना वसुली व ठेव परतीच्या सूचना दिल्या आहेत. ‘मानिनी’चे दप्तर नसल्याचे अवसायक चौगुलेंनी सांगितले. संबंधित संचालकांवर फौजदारी करून दप्तर ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.- अरुण काकडे (जिल्हा उपनिबंधक)