शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

सुरक्षिततेसाठी यंत्रणा सज्ज

By admin | Updated: October 1, 2016 00:59 IST

अंबाबाई मंदिर : देवस्थान समितीकडून भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन व देवस्थान समितीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. देवस्थान समितीच्यावतीने भाविकांसाठी दर्शन रांगांमध्ये स्क्रीन, पालखीचे थेट प्रक्षेपण, वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका, शू स्टँड, मुखदर्शन, अशा सोयींसह आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती सचिव विजय पोवार यांनी दिली. जिल्हा प्रशासन व देवस्थान समितीच्यावतीने शेतकरी संघ, भवानी मंडप येथे आपत्ती नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून गरज वाटल्यास भाविक ०२३१-२६४४४४४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.मंदिर व परिसराच्या सुरक्षिततेसाठी ४२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, मंदिर कार्यालय व जुना राजवाडा पोलिस स्टेशन येथे त्याचे फुटेज पाहण्यासाठी स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पाच किलोंचे ३० फायर एस्टिंगविशरर्स लावण्यात आले आहेत व विद्यापीठ गेट येथे अग्निशमन गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.