शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमध्ये स्वाईन फ्लूने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 01:00 IST

गडहिंग्लजमध्ये स्वाईन फ्लूने तरुणाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगडहिंग्लज : आठवड्यापूर्वी स्वाईन फ्ल्युची लागण झालेल्या येथील रवींद्र रामचंद्र सांगलीकर (वय ४३, रा. संभाजीनगर, कडगाव रोड, गडहिंग्लज) यांचा उपचार सुरू असताना कोल्हापूर येथील एका खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. गडहिंग्लज शहरातील स्वाईनचा हा पहिला बळी ठरला. गडहिंग्लज बसस्थानकाच्या आवारात सांगलीकर यांचे चप्पल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. आठवड्यापूर्वी ते काही कामानिमित्त बेळगावला गेले होते. तेथून आल्यानंतर त्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाला. गडहिंग्लजमध्ये उपचार घेतल्यानंतरही खोकला कमी न झाल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणीत त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्प्पन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी व दोन मुलगे असा परिवार आहे. ‘गडहिंग्लज’कर हळहळले..!सांगलीकर यांचे मूळ गाव कर्नाटकातील सिंदीकुरबेट, गडहिंग्लज हे त्यांचे आजोळ. सुमारे ५० वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंबीय गडहिंग्लजमध्ये स्थायिक झाले आहे. त्यांचे वडील व भाऊदेखील येथील बसस्थानक परिसरात चप्पल दुरुस्तीचा व्यवसाय करतात. अलीकडेच रवींद्र यांनी बसस्थानक आवारात स्वतंत्र दुकान सुरू केले होते. त्यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याने गडहिंग्लज बसस्थानक आवारातील सर्व दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अकाली मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.नगरपालिकेतर्फे जनजागृती मोहीमगडहिंग्लजमधील औषधोपचारानंतरही रवींद्र यांचा खोकला कमी झाला नव्हता. म्हणून त्यांना कोल्हापूर येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथील तपासणीअंती त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याचठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी मध्यरात्री उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांच्या कुटुंबातील ११ जणांवरही औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. आरोग्य विभाग व नगरपालिकेतर्फे जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे.