शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्विमर्सना ‘बॅक’स्ट्रोक

By admin | Updated: March 17, 2016 23:50 IST

जलतरण तलाव बंदचा फटका : नऊशेहून अधिकजणांचा सराव रखडणार

सचिन भोसले -- कोल्हापूर -विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जलतरण तलाव दोन महिने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी जर कोल्हापुरात झाली तर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची तयारी करणारे जलतरणपटू दोन महिने सरावापासून वंचित राहतील. याशिवाय सुमारे दहा हजारांहून अधिक हौशी जलतरणपटू , नवशिके आणि सुटीत पोहण्याचा आनंद लुटणारी मुले या निर्णयामुळे पोहण्यापासून दूर राहतील, अशी भिती जाणकारांकडून व्यक्त होत आहे.सद्य:स्थितीत कोल्हापुरात एकूण सात जलतरण तलाव आहेत. यापैकी तीन महापालिकेचे, तर खासगी पाच जलतरण तलाव आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या अंबाई टँकमध्ये कमी तिकीट दर असल्याने सर्वसामान्य वर्गातील १६०० ते २००० मुले दिवसभरातील आठ बॅचेसमधून दररोज पोहण्याचा व शिकण्याचा आनंद लुटतात. याचसारखी स्थिती रमणमळा, शाहू जलतरण तलाव येथेही आहे. याशिवाय शिवाजी स्टेडियम ट्रस्टचा जलतरण तलाव, खासगी भवानी जलतरण तलाव, रेसिडेन्सी क्लब, सागर पाटील जलतरण तलाव अशा चारही ठिकाणी मोठे शुल्क भरूनही पोहण्याचा आनंद व स्पर्धेची तयारी करणाऱ्या जलतरणपटूंचा समावेश आहे. सुमारे दहा हजारांहून अधिक जण पोहण्याच्या आनंदापासून दूर राहणार आहेत. त्यात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय जलतरण स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंची संख्याही सुमारे ९०० इतकी आहे. त्यांनाही या निर्णयाचा फटका बसणार आहे. कोल्हापूरने विरधवल खाडे, मंदार दिवसे यांसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरणपटू दिले आहेत. येथील जलतरण तलावातच त्यांनी आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. कोल्हापुरात इतर जिल्ह्यांसारखी पाणीटंचाई नाही. त्यामुळे या तलावांवर निर्बंध आणून हे बंद करू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महापालिकेचे तलाव हे गोरगरिबांचे पोहणे, शिकणे व स्पर्धेची तयारी करणे याकरिता मोठा आधार आहेत. दुष्काळग्रस्त भागात आपले क्षेत्र मोडत नाही. याशिवाय हे पाणी काय दररोज भरावे लागत नाही. वारंवार हे पाणी फिल्टर करून वापरले जाते. त्यामुळे कोल्हापूरला वगळून हा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी अन्य जिल्ह्यांत लागू करावा.- एस. डी. मोहिते, जलतरणपटू. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जलतरण तलावातून सुमारे ९०० जलतरणपटू येणाऱ्या विविध स्पर्धांकरिता सराव करीत आहेत. त्यामध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूंचा समावेश आहे. त्यात विशेष म्हणजे पाण्याचे शुद्धिकरण सातत्याने होत असल्याने तेच पाणी पुन्हा तलावात सोडले जाते. त्यामुळे दररोज इतके पाणी लागत नाही. या निर्णयातून कोल्हापूरला वगळावे.- अजित सरनाईक, जलतरण प्रशिक्षक.सरकारच्या आदेशानुसार तो प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांशी चर्चा करून कोल्हापुरातही अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यात महापालिका असो अथवा खासगी जलतरण तलावअसोत, आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी लागेल.- प्रमोद बराले, इस्टेट विभागप्रमुख, मनपा.