शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

गोड बोलण्याने कटुता नष्ट होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:17 IST

गोड बोलण्याने कटुता नष्ट होते व सुसंवाद ठेवल्याने समोरच्याचे मन जिंकता येते या सूत्रानेच आपण काम करत आहे. याचा ...

गोड बोलण्याने कटुता नष्ट होते व सुसंवाद ठेवल्याने समोरच्याचे मन जिंकता येते या सूत्रानेच आपण काम करत आहे. याचा आतापर्यंतच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये तोट्यापेक्षा फायदाच अधिक झाला आहे. गोड बोलूनही लोकांची कामे होतात या मताचे आपण आहोत. अनेकवेळा शासकीय अधिकारी व जनता यामध्ये होणारे वाद हे सुसंवाद नीट न झाल्यानेच होतात. त्यासाठी समोरच्याशी चांगल्या पद्धतीने व्यवहार आणि संवाद होणे गरजेचा आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार ऐकली तरी लोकांना समाधान वाटते; त्यामुळे संबंधिताला त्याची बाजू मांडायला देणे, त्याचे शांतपणे ऐकून घेणे, खरोखरंच अन्याय झाला असेल तर त्यात स्वत: लक्ष घालून काम करणे, अशा पद्धतीने काम सुरू आहे. खालच्या पातळीवर न्याय न मिळाल्यानेच एखादा त्रस्त नागरिक आपल्याकडे तक्रार घेऊन येतो; त्यामुळे अशा प्रकरणांसाठी पर्सनल अटेंशन रजिस्टर (पीएआर) अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये आपण स्वत: वैयक्तिक लक्ष घालून आलेल्या तक्रारींबाबत संबंधित विभागाला कळवून त्याबाबत दर आठवड्याला होणाºया विभागप्रमुखांच्या बैठकीत आढावा घेतला जातो.आपल्याकडे आंदोलनाच्या निमित्ताने भेटायला येणाºया शिष्टमंडळांचा विचार करता, त्यांना खालच्या स्तरावरील प्रशासकीय यंत्रणेकडून न्याय मिळालेला नसतो व त्यांची बाजू योग्यप्रकारे ऐकून घेतलेली नसते. शेवटचा पर्याय म्हणून ते माझ्याकडे येत असतात. त्यामुळे त्या लोकांशी गोड बोलून शांतपणे ऐकून घेतल्यावर त्यांच्यामध्येही समाधानाचे व विश्वासाचे वातावरण निर्माण होते. आंदोलकांची बाजू प्रेमाने ऐकून घेऊन त्यांची सोडवणूक केल्यास ते समाधानाने परत जातात. तसेच एखादे काम हे नियमानुसार होत नसेल हे शांतपणे पटवून दिल्यास संबंधितालाही ते पटत. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ व शिवाजी पूल या ज्वलंत प्रश्नांवरील आंदोलनासंदर्भात वेळोवेळी भेटायला आलेल्या शिष्टमंडळाची भूमिका शांतपणे ऐकून घेऊन त्यांच्याशी गोड बोलून सुसंवाद ठेवला; त्यामुळे यातून चांगल्या पद्धतीने मार्ग निघून अंबाबाई मंदिर पुजाºयांचा कायदा झाला, तर शिवाजी पुलाचे काम सुरू होऊन ते महिन्याभरात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.- अविनाश सुभेदार,जिल्हाधिकारी