शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा घाटावर ‘स्वच्छ भारत अभियान’

By admin | Updated: December 26, 2014 00:03 IST

वाजपेयी यांचा वाढदिवस : जिल्हा भाजपतर्फे आयोजन; महापालिकेच्या यंत्रणेचा सहभाग

कोल्हापूर : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आज, गुरुवारी कोल्हापुरातील पंचगंगा घाट नदी परिसरात जिल्हा भारतीय जनता पक्षाच्यावतीने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात आले. या अभियानात महापालिकेची यंत्रणा मनुष्यबळ, वाहन व स्वच्छता अवजारे यांच्यासह सहभागी झाली होती.यावेळी जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले, वाजपेयी यांचा वाढदिवस खऱ्या अर्थान सकारात्मक कृतीद्वारे आपण साजरा केला आहे. त्यांना केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंचगंगा घाट सुशोभित करणे, पंचगंगेचे वैभव पुन्हा उभारणे, त्याचप्रमाणे साबरमतीच्या धर्तीवर पंचगंगा नदीघाट सुशोभित करणे व अत्यंत चांगल्या प्रतीची सुविधा असणारी व्यवस्था घाटावर निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी आणण्याचा प्रयत्न करू.याठिकाणी साचलेला कचरा, प्लास्टिक, दगड, खरमाती, निर्माल्य, गवत, तण, आदी प्रकारचा कचरा डंपरमधून हलविण्यात आला. अभियानात नगरसेवक महेश जाधव, आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, नगरसेविका प्रभा टिपुगडे, प्रदेश सदस्य अ‍ॅड. संपतराव पवार, सरचिटणीस संतोष भिवटे, राहुल चिकोडे, युवा अध्यक्ष संदीप देसाई, विजय जाधव, सुरेश जरग, हेमंत आराध्ये, विजय गायकवाड, हर्षद कुंभोजकर, किरण कुलकर्णी, श्रीकांत घुंटे, दिलीप मैत्राणी, अमोल पालोजी, मामा कोळवणकर, अशोक लोहार, उमेश निरंकारी, तौफिक बागवान, अनिल काटकर, सुनील टिपुगडे, नितीन निकम, पपेश भोसले यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.पंचगंगा नदीघाट येथील स्वच्छ भारत अभियानात कोल्हापूर महापालिकेचे सुमारे दोनशे कर्मचारी, दोन जे. सी. बी., दोन डंपर, आदी मनुष्यबळ व यंत्रसामग्री होती. या अभियानात विभागीय आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, तानाजी पाडळकर, आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, स्वप्निल उलपे, मुनीर फरास, राजगोळकर, आदींचा सहभाग होता.