शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘दत्त’च्या रणांगणातून ‘स्वाभिमानी’ची माघार

By admin | Updated: July 19, 2014 00:32 IST

सभासद वाढविले : मल्टीस्टेट कायद्यातील अटीमध्ये मनमानी नियम केल्याचा आरोप

जयसिंगपूर : मल्टीस्टेट कायद्यातील जाचक अटी व साखर कारखान्याने पोटनियमात केलेल्या मनमानी नियमांमुळे तसेच शिरोळ ‘दत्त’ प्रशासनाने हितसंबंध डोळ्यांसमोर ठेवून वाढविलेल्या सभासदांमुळे दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज, शुक्रवारी घेतला. प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्वाभिमानीने पत्रकाद्वारे दिली. स्वाभिमानीच्या जयसिंगपूर येथील प्रधान कार्यालयात झालेल्या बैठकीत कारखाना निवडणुकीबाबत प्रमुख कार्यकर्त्यांनी मते मांडली. दत्त साखर कारखाना हा मल्टीस्टेट असल्याने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांत या साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे, हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून साखर कारखान्याच्या निवडणुका आतापर्यंत लढविल्या आहेत. गेल्या पाच-सहा निवडणुकींचा अनुभव पाहता मल्टीस्टेट कायद्याचा आधार घेऊन सक्षम विरोधी उमेदवारांचे अर्ज छाननीत उडविले जातात. विरोध करणाऱ्या बहुतांश सभासदांचे सभासदत्व रद्द केले आहे. तसेच नवीन सभासद करताना हितचिंतकांचा जादा भरणा केला आहे. साखर कारखान्यांच्या निवडणुका या सभासद गटवार पद्धतीने घेतल्या जातात. मात्र, दत्त कारखान्याच्या प्रशासनाने कारखाना कार्यस्थळावर सर्व सभासदांना एकाच ठिकाणी मतदान करण्याची जाचक अट घातलेली आहे. गटवार पद्धतीने निवडणुका नसल्यामुळे सभासदांनाही अडचणीचे ठरते आहे. निवडणुकीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना अलिप्त राहील. याचा अर्थ ‘स्वाभिमानी’ दत्त साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करीत आहे, असा होत नाही. दत्त कारखान्याच्या चुकीच्या निर्णयावर ‘स्वाभिमानी’ वेळावेळी प्रहार करून प्रशासनावर अंकुश ठेवणार आहे. तसेच बहुराज्यीय कायद्यातील जाचक अटी दूर करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचेही स्वाभिमानीने स्पष्ट केले आहे. यावेळी अण्णासाहेब चौगुले, उल्हास पाटील, सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, आदिनाथ हेमगिरे, के. आर. चव्हाण, डॉ. श्रीवर्धन पाटील, महेश पाटील, मिलिंद साखरपे उपस्थित होते. पोटनियमांच्या जाचक अटींमुळे आम्हाला सक्षम उमेदवार देता येत नाहीत. पाच वर्षांतील उसाच्या नोंदीचे रजिस्टर, सर्वसाधारण सभेचे हजेरीपत्रक सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असते. यामुळे सत्ताधाऱ्यांकडून आमच्या उमेदवारांचे अर्ज अपात्र होण्याची भीती होती. शिवाय कर्नाटकातील सभासद अधिक आहेत. यामुळे आतापर्यंत आम्हाला पूर्ण पॅनेल करता आले नाही. ‘स्वाभिमानी’ने आता कार्यपद्धती बदलली आहे. विधानसभेला ताकदीने आम्ही उतरु. - राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना