शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ला काही फरक पडणार नाही : शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कोणतीही फूट पडलेली नाही. संघटनेशी ज्यांनी इकडे-तिकडे केले, त्यांची हकालपट्टी झालेली आहे. वाळवा तालुक्यातील शेतकरी माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे कोणीही कोणताही पक्ष काढला तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्याचा फरक पडणार नाही, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कोणतीही फूट पडलेली नाही. संघटनेशी ज्यांनी इकडे-तिकडे केले, त्यांची हकालपट्टी झालेली आहे. वाळवा तालुक्यातील शेतकरी माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे कोणीही कोणताही पक्ष काढला तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्याचा फरक पडणार नाही, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता मारला.येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी सायंकाळी खासदार राजू शेट्टी यांनी वाळवा तालुक्यातील संघटनेचे कार्यकर्ते व शेतकºयांची बैठक घेतली.यावेळी खा. शेट्टी म्हणाले की, तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणून राजीनामा घेतल्याची सोशल मीडियावर जाहिरातबाजी सुरू आहे. माझे कार्यकर्ते लाख मोलाचे आहेत. माझ्या संघटनेत कोणीही इकडे-तिकडे करणार नाही. तालुक्यातील शेतकरी माझ्या पाठीशी आहेत. त्यांच्याशी मी कधीही बेईमानी करणार नाही. सत्तेसाठी कोणीतरी लाचार झाले असेल, मात्र मी सत्तेचा लाचार नाही. अखेरपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सोडवत राहणार आहे.यावेळी स्वाभिमानी प्रवासी वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी साठे यांनी खासदार शेट्टी यांच्यासमवेत राहण्याचा निर्णय जाहीर केला. बैठकीस तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शहाजी पाटील, युवा आघाडीचे प्रवीण पाटील, शिवाजी मोरे, प्रकाश देसाई, मधुकर डिसले, राम पाटील, मकरंद करळे, आप्पासाहेब पाटील, सागर पाटील, महेश पाटील, सुरेश आवटी, तात्यासाहेब कोळेकर, रमेश हजारे, पंडित सपकाळ, नामदेव सावंत उपस्थित होते. संघटनेचे प्रवक्ते भागवत जाधव यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. एस. यु. संदे यांनी आभार मानले.खासदारांचा फेरफटकाखासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सायंकाळी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, रिपब्लिकन पक्षाचे अरुण कांबळे, माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे यांच्यासोबत आंबेडकरनाका परिसरातून उपनगराध्यक्ष पाटील यांच्या घरापर्यंत पायीच फेरफटका मारला. उपनगराध्यक्षांच्या घरी चहापान घेतल्यानंतर खासदार शेट्टी यांनी माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, सयाजी जाधव यांच्या कुटुंबाची भेट घ्ंोऊन त्यांचे सांत्वन केले.