शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी संघटनेत फूट

By admin | Updated: September 21, 2014 00:45 IST

खराडे, बी. जी. पाटील यांचे बंड : महायुतीला फटका शक्य

सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महायुतीशी जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच राज्य प्रवक्ते महेश खराडे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी आज, शनिवारी बंडखोरीचा निर्णय जाहीर केला. नेत्यांच्या भिन्न भूमिकांमुळे उमेदवारीवरून संघटनेत फूट पडली असून, त्याचा फटका महायुतीला बसणार आहे.‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांची भाजप-शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी जागांबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, तेथून ‘स्वाभिमानी’कडून महेश खराडे इच्छुक आहेत. घोरपडे यांच्या हालचालींमुळे ते अस्वस्थ असून, त्यांनी बंडखोरी जाहीर करून संपर्क, गाठीभेटी सुरू केल्याचे सांगितले. आज संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बी. जी. पाटील यांनीही इस्लामपूर मतदारसंघातून स्वत:ची उमेदवारी जाहीर करून सोमवारी (दि. २२) अर्ज भरणार असल्याचे सांगितले. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.खराडे म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन, सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचले आहेत. पाच वर्षे आम्ही मेहनत करायची आणि अचानक उमेदवारी दुसऱ्याला द्यायची ही भूमिका संघटनेतील कार्यकर्त्यांसाठी अन्यायकारक आहे. घोरपडे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी तडजोड करून अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर पाच वर्षांत घोरपडे एकदाही फिरकले नाहीत. शेतकरी, दुष्काळग्रस्तांच्या समस्यांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. सामान्य जनता अडचणीत असताना घोरपडे अज्ञातवासात होते. मी तासगाव-कवठेमहांकाळमधून दि. २४ रोजी अर्ज भरणार आहे.खराडे, बी. जी. पाटील यांच्या बंडखोरीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधकांची मतविभागणी होऊन महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)