शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ही ‘केडीसीसी’च्या रिंगणात

By admin | Updated: April 7, 2015 01:22 IST

राजू शेट्टी : चांगल्या लोकांना बरोबर घेऊन बँक वाचविणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या (केडीसीसी) रिंगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे यांनी विविध गटांतून उमेदवारी अर्ज दाखल केले. खासदार शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातून विकास सेवा संस्था गटातून, सावकर मादनाईक यांनी प्रक्रिया संस्था, तर विठ्ठल मोरे यांनी नागरी बॅँक गटातून अर्ज दाखल केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्यासह आणखी कार्यकर्ते मंगळवार व बुधवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, जिल्हा बॅँक ही सर्वसामान्य माणसांची बॅँक आहे. विविध संस्थांचे रिझर्व्ह फंड, भागभांडवल या बॅँकेत गुंतले आहेत. या निधीवरील लाभांश व व्याजातून प्राथमिक संस्थांचा खर्च भागत होता; पण गेले दहा वर्षे लाभांश मिळत नसल्याने अनेक संस्था अडचणीत आल्या आहेत. नेते मंडळींच्या खाबूगिरीमुळे संस्था मोडीत निघाल्या आहेत. बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांनी संचालक नको प्रशासकच हवा, अशी एकमुखी मागणी केली असताना याच मंडळींच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उड्या सुरू आहेत. जिल्हा बॅँकेत या लोकांचा आत्मा गुंतल्याची टीकाही शेट्टी यांनी केली. जिल्हा बॅँक म्हणजे ग्रामीण विकासाचे मंदिर आहे; पण या मंडळींनी राजकारणाचा अड्डा बनविल्याने सामान्य माणूस अडचणीत आला. शेतकरी संघटनेने अर्ज दाखल केले आहेत, सभासदांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पहावे लागेल. वेळ प्रसंगी जिल्हा बॅँकेच्या भल्यासाठी एखादे पाऊल मागे घ्यावे लागले तरी बेहत्तर, पण बॅँक वाचविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘राजें’चे स्वागतच!विक्रमसिंह घाटगे यांनी जिल्हा बँकेत यावे, याबाबत विचारले असता, जिल्ह्यात अनेक संस्था चांगल्या चालल्या आहेत. बॅँकेच्या भल्यासाठी अशा मंडळींनी पुढे यायलाच हवे, विक्रमसिंह घाटगे यांचे स्वागतच करू, असे शेट्टी यांनी सांगितले. मोडीत काढणारेच वाचविण्यास पुढेज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे जिल्हा बॅँक अडचणीत आली, त्याच मंडळींचा अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळली आहे. बॅँक मोडीत काढणारेच वाचविण्यासाठी पुढे असल्याची टीका खासदार शेट्टी यांनी केली.खरेदी-विक्रीला बळी पडू नकाचांगली माणसे निवडणुकीत उतरली नाही, तर ज्यांनी बॅँक संपविली तीच मंडळी पुन्हा सत्तेवर येतील. माझे ठरावधारकांना आवाहन आहे, त्यांनी मतांची खरेदी-विक्री करू नये, चांगल्या माणसांना पाठवावे, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले. ‘गोकुळ’बाबत योग्य वेळी भूमिकाजिल्हा बॅँकेत आम्ही उतरलोच आहे, ‘गोकुळ’च्या निवडणुकीवर आम्ही लक्ष ठेवून आहे. योग्य वेळी भूमिका घेऊ, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली.