शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णमहोत्सवी निधीचा प्रश्न लवकरच मार्गी!

By admin | Updated: June 20, 2015 00:54 IST

चंद्रकांतदादा पाटील : शिवाजी विद्यापीठातर्फे देवानंद शिंदे यांचा सत्कार

कोल्हापूर : राज्य शासनाने शिवाजी विद्यापीठासाठी घोषित केलेला ४५ कोटींच्या सुवर्णमहोत्सवी निधीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल. यासाठी ३० जूनला वित्त व नियोजन मंत्र्यांसमवेत बैठक घेतली जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे सांगितले. विद्यापीठाचे नूतन कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांचे स्वागत आणि माजी प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, माजी बीसीयुडी संचालकप्रा. आर. बी. पाटील यांच्याप्रती कृतज्ञता सोहळा विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला. यावेळी मंत्री पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते.ते म्हणाले, विद्यापीठाला अत्यंत वैभवशाली व पुरोगामी वारसा लाभला आहे. तो वारसा व वसा डोळ्यांसमोर ठेवून नूतन कुलगुरू डॉ. शिंदे आपली कारकीर्द यशस्वीरीत्या पूर्ण करतील, याची मला खात्री आहे. डॉ. शिंदे यांच्या रूपाने विद्यापीठाला नि:स्वार्थी, पारदर्शी व्यक्तिमत्त्वाचे चांगले कुलगुरू लाभले आहेत.कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, संवाद, समन्वय आणि सहकार्य ही आपल्या कारकिर्दीची त्रिसूत्री असणार आहे. विद्यापीठात आलो असलो तरी माझी पाटी कोरी आहे. त्या कोऱ्या पाटीवर विकासाचा मंत्र लिहिण्याच्या कामी विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांनी मदत करावी. डॉ. अशोक भोईटे म्हणाले, डिस्कशन-डायलॉग-डिप्लोमसी या त्रिसूत्रीच्या आधारे विद्यापीठात कार्यरत राहिलो. विद्यापीठाचे ‘व्हिजन-२०२०’, नॅकसाठी निर्दोष असा एसएसआर अहवाल तयार करण्यात योगदान देता आले. त्यातून विद्यापीठाला ‘अ’ मानांकन मिळवून देता आले, याचा आनंद वाटतो. यावेळी मंत्री पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन नूतन कुलगुरू डॉ. शिंदे यांचे स्वागत करण्यात आले, तसेच डॉ. भोईटे व प्रा. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. माजी आमदार भगवानराव साळुंखे, बाबा सावंत, रंजना फड, डॉ. व्ही. बी. ककडे, संजय कुबल, शंकरराव कुलकर्णी, प्रताप ऊर्फ भय्या माने, डॉ. डी. आर. मोरे, प्रा. अण्णासाहेब कवणे, सुभाष कुलकर्णी, विष्णू खाडे, श्वेता परूळेकर यांची यावेळी भाषणे झाली. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे स्वागत यांनी केले. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आता सत्कार नको...विद्यापीठातील आजच्या सत्कारानंतर यापुढे कोणीही माझा सत्कार करू नये. त्यासाठी होणाऱ्या खर्चातून गरजू विद्यार्थी, विद्यार्थिनींचे प्रवेश शुल्क भरण्यासाठी मदत करा, असे आवाहन नूतन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले. ते म्हणाले, डॉ. भोईटे यांनी राबविलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला गती देण्याचा प्रयत्न राहणार असून, त्यासाठी बिंदू चौकासह शहरातील अशी सार्वजनिक ठिकाणे निवडून त्या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी नूतन कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांचा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, बीसीयूडी संचालक डॉ. आर. बी. पाटील उपस्थित होते.