शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय देणारा शाश्वत विकास महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST

गडहिंग्लज : औद्योगिकरणामुळे विकासाच्या प्रक्रियेला गती मिळाली. परंतु, हा विकास सर्वसामान्यांना उपयुक्त न ठरता भांडवली व्यवस्थेला पूरक बनला आहे. ...

गडहिंग्लज : औद्योगिकरणामुळे विकासाच्या प्रक्रियेला गती मिळाली. परंतु, हा विकास सर्वसामान्यांना उपयुक्त न ठरता भांडवली व्यवस्थेला पूरक बनला आहे. त्यामुळे सामाजिक न्याय प्रस्थापित करणाऱ्या शाश्वत विकासाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ. प्रवीण सप्तर्षी (अमेरिका) यांनी केले.

गडहिंग्लज येथील डॉ. घाळी महाविद्यालयातर्फे आयोजित ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी चर्चासत्राचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी होते. अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी होते. प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिर्के म्हणाले की, मानवी विकासासाठी सर्व शाखांमधून होणारे संशोधन महत्त्वाचे असते. त्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणातून मूलभूत संशोधनाला महत्त्व देण्यात आले आहे. संशोधन सर्वसमावेशक आणि समाजोपयोगी असले पाहिजे.

पाटील म्हणाले की, शाश्वत विकासासाठी पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे असून, पाण्याशिवाय विकासाची व्याख्या पूर्ण होऊ शकत नाही. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी औष्णिक आणि सौरऊर्जेसाठी अधिक संशोधन करायला हवे.

पहिल्या सत्रात डॉ. गजानन घोडके (द. कोरिया) यांनी ग्रीन केमिस्ट्रीमधील १२ तत्त्वांचा वापर करून शाश्वत विकास साध्य करण्याबाबत विवेचन केले. घातक रसायनांचा वापर टाळून सुरक्षित रसायनांचा वापर आणि वस्तूंचा पुनर्वापर करण्याची मानसिकता रुजवायला हवी.

दुसऱ्या सत्रात डॉ. दत्तात्रय ढवळे (कतार) यांनी नॅनो मटेरिअल्सचा वापर करून औषधे व रसायनांची निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रात निशी लॉक्सिमॉन (मॉरिसिस) यांनी मराठी भाषेचा विकास आणि परदेशातील तिचे उपयोजन याची मांडणी केली.

परिषदेस भारतातून विविध राज्यांसह परदेशातील अमेरिका, आफ्रिका, उझबेकिस्तान, ट्युनिशिया, अझरबैझान, मॉरिसिस येथील १८१ हून अधिक शोधनिबंध प्राप्त झाले. ३२७ लोकांनी नोंदणी करून परिषदेस उपस्थिती दर्शविली.

प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. परिषदेचे मुख्य समन्वयक अनिल गोडघाटे, सहसमन्वयक डॉ. दत्तात्रय वाघमारे, डॉ. नीलेश शेळके यांनी नियोजन केले.