शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘भोगावती’ निवडणूक स्थगितीबाबत संदिग्धता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 00:14 IST

सहकार विभागाची अद्याप सूचनाच नाही : सभासदांच्या नजरा आदेशाकडे

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक स्थगितीबाबत शुक्रवारीही सहकार विभागाकडून कोणतेही आदेश आले नाहीत. त्यामुळे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार की थांबणार याबाबत सभासदांमध्ये संदिग्धता कायम आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘भोगावती’ साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासह छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात ‘अ’ वर्ग संस्थेची निवडणूक जाहीर करता येत नाही, असा सहकारात कायदा आहे. याविरोधात काँग्रेसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याबाबत सहकार विभागाने निर्णय घ्यावा, असे आदेश दिले होते. सहकार विभागाने निवडणुकीला मार्चपर्यंत स्थगिती दिल्याची चर्चा गुरुवारी जिल्ह्यात धडकली. याबाबत सहकारमंत्र्यांनी दुजोरा दिला नसला तरी काँग्रेसचे नेते ठामपणे सांगत असल्याने जिल्ह्यात संभ्रमावस्था पसरली आहे. शुक्रवारी सहकार विभागाकडून काहीतरी आदेश येईल, असे वाटत होते. या निर्णयाकडे सभासदांच्या नजरा लागल्या होत्या. सहकार खात्याकडून घेण्यात येणारा निर्णय प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे येणार आहे. सहसंचालक कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांना मार्गदर्शन करणार आहेत; पण अद्याप कोणताच आदेश आला नसल्याने निवडणुकीबाबत संदिग्धता कायम राहिली आहे. छाननीवर दोन तक्रारी !कारखान्यासाठी दाखल झालेल्या अर्जावर बुधवारी (दि. १८) छाननी झाली. त्यामध्ये अपात्र ठरविलेल्यांपैकी दोघांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे दाद मागितली आहे. ऊस पुरवठा नसल्याने अर्ज अपात्र ठरविल्याबाबत ही तक्रार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार : धैर्यशील पाटीलभोगावती : भोगावती साखर कारखान्याची निवडणूक जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पार पाडावी, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी दिले आहेत. न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती शंतनू केमकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या व शेकापच्यावतीने निवडणुकीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय दिला आहे, अशी माहिती भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.निवेदनावर धैर्यशील पाटील-कौलवकर, नामदेव पाटील, हंबीराव पाटील, अशोकराव पवार -पाटील, केरबा भाऊ पाटील, प्रा. किसन चौगले, प्रा. पांडुरंग डोंगळे, संभाजी पाटील, एकनाथ पाटील, अविनाश पाटील, महादेव कोथळकर, रघुनाथ जाधव , वसंतराव पाटील, सुनील कारंडे, शिवाजीराव पाटील, शंकर दादू पाटील, डी. पी. कांबळे, बाबूराव हजारे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. भोगावती कारखाना पाण्याअभावी बंदभोगावती : भोगावती साखर कारखाना पाण्याअभावी शुक्रवारी दुपारपासून बंद ठेवण्यात आला आहे. भोगावती नदीला सध्या पाटबंधारे खात्याकडून काही कालावधीसाठी पाणीपुरवठा कमी केला आहे. त्याचा परिणाम कारखान्यावर होऊन कारखाना पाण्याअभावी आता बंद आहे.