शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांशी मगु्ररीने वागाल तर जाग्यावर निलंबन; हसन मुश्रीफ यांचा कर्मचाऱ्यांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:43 IST

कोल्हापूर : जिल्हा बॅँकेच्या शाखांत येणाºया प्रत्येक ग्राहकाची सौजन्याने विचारपूस करून व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करा. ग्राहकांशी मगु्ररीने वागल्याची तक्रार आल्यास जाग्यावर निलंबित केले जाईल. कोणाचीही गय करणार नसल्याचा इशारा जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. आर्थिक वर्षातील सहा महिन्यांचा कालावधी राहिला आहे. आपली मक्तेदारी संपली असून, ग्राहकांच्या घरापर्यंत ...

कोल्हापूर : जिल्हा बॅँकेच्या शाखांत येणाºया प्रत्येक ग्राहकाची सौजन्याने विचारपूस करून व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करा. ग्राहकांशी मगु्ररीने वागल्याची तक्रार आल्यास जाग्यावर निलंबित केले जाईल. कोणाचीही गय करणार नसल्याचा इशारा जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. आर्थिक वर्षातील सहा महिन्यांचा कालावधी राहिला आहे. आपली मक्तेदारी संपली असून, ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन व्यवसाय वृद्धीचा इष्टांक पूर्ण करा, असे आवाहनही त्यांनी केले.जिल्हा बॅँकेच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी आयोजित कर्मचाºयांच्या मेळाव्यात ते बोलत होते.हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्यावर्षी दिलेले उद्दिष्ट आणि पूर्तता यांची तुलना केली तर आपण खूप मागे राहिलो. तरीही काटकसरीचा कारभार करून संस्थांना आठ टक्के लाभांश आणि कर्मचाºयांना नऊ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला. साखरेला हमीभाव मिळाल्याने साखर उद्योग स्थिरावला आहे. आता साखर उद्योगाला कर्ज देण्याची भीती नाही; पण आपल्याकडे पैसे कमी पडतात. त्यासाठी शेअर्स भांडवल व ठेवी गोळा करण्यासाठी कामाला लागा. मुदत संपलेल्या ठेवी पुन्हा आपल्याकडे कशा राहतील, यासाठी प्रयत्न करा. आम्ही प्रामाणिकपणे काम करीत आहोत, तसे तुम्हीही करा. पूर्वीचे दिवस विसरा. मक्तेदारी संपली असून काम करणारेच करत राहतात इतरजण पुढारीपण करीत असल्याच्या युनियनच्या तक्रारी आहेत. रजा न टाकता कोणी उद्योग करीत असेल तर त्याचे नुसते नाव कळवा; तो कितीही जवळचा असला तरी त्याची गय करणार नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, व्यवस्थापक जी. एम. शिंदे, बी. एस. कालेकर, रणवीर चव्हाण, संचालक पी. जी. श्ािंदे, भैया माने, अनिल पाटील, उदयानी साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.मुश्रीफ यांच्यामुळेच बँक सक्षमहसन मुश्रीफ यांच्या कुशल नेतृत्वामुळेच १७४ कोटींचा संचित तोटा कमी करून बॅँक नफ्यात आली. त्यांचे कागलमधील राजकारण काय असेल ते असेल; पण त्यांनी बॅँकेतील चुकीचे पायंडे बंद केल्याचे पी. जी. शिंदे यांनी सांगितले.तुमच्याप्रमाणे बँकेचा इंडेक्स वाढवाबॅँकेचे आतापर्यंत ७०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले तरी पगारात वाढ होत गेली. दर तीन महिन्यांनी इंडेक्सप्रमाणे पगारात वाढ होत असल्याने आता पगारावर १०० कोटी खर्च होतो. तुमचा इंडेक्स वाढतो तसा बॅँकेचाही वाढवा, असा चिमटा मुश्रीफ यांनी काढला.‘महालक्ष्मी’ पुनर्गुंतवणूकयोजनेचा प्रारंभतीन वर्षे मुदतीच्या व १०.५२ टक्के व्याजाच्या ‘महालक्ष्मी पुनर्गुंतवणूक ठेव योजने’चा प्रारंभ करण्यात आला. यामध्ये पाच हजारांपासून ठेव ठेवता येणार असून डिसेंबर २०१८ पर्यंत मुदत राहणार आहे.