शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
5
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
6
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
8
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
9
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
10
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
11
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
12
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
13
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
14
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
15
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
16
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
17
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
18
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
19
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
20
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस

By admin | Updated: December 19, 2014 23:50 IST

खंडेराजुरीत प्रसुतीकडे दुर्लक्ष : डॉक्टरांचा घरभाडेभत्ता कपात करणार

सांगली : खंडेराजुरी (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या एका महिलेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोन वैद्यकीय अधिकारी आणि पाच आरोग्य सेविका व सेवकांवर कारवाईचा प्रस्ताव तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे सादर केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पाच कर्मचाऱ्यांना निलंबित का करू नये, अशी नोटीस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावली आहे. मुख्यालयात राहात नसल्याचाही त्यांच्यावर ठपका ठेवला आहे.गुरुवारी खंडेराजुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक महिला प्रसुतीसाठी आली होती. यावेळी आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे संबंधित महिलेची प्रवेशद्वारातच प्रसुती झाल्याचा आरोप मिरज पंचायत समिती सदस्यांनी केला होता. याप्रकरणी ताालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मधू पाटील यांनी आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. याचा अहवाल त्यांनी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांच्याकडे सादर केला. या अहवालाच्याआधारे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी आरोग्य केंद्रातील डॉ. ए. आर. गुरव, डॉ. डी. बी. कांबळे, आरोग्यसेविका सौ. एस. बी. तांबे, ई. एस. मुल्ला, एम. एस. पाटील, आरोग्यसेवक एम. एस. गोपाल यांच्यावर दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून कारवाईच्या नोटिसा बजाविल्या आहेत. तुमच्यावर निलंबनाची कारवाई का करू नये, असे त्यात म्हटले आहे. मुख्यालयात राहात नसल्याबद्दलचा खुलासाही त्यांच्याकडून मागविला आहे. या अहवालानंतर दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)निलंबनाची कारवाई करणारखंडेराजुरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात वारंवार तक्रारी आहेत. मुख्यालयातही ते राहात नाहीत. याप्रकरणी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा घरभाडेभत्ता कपात करून त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.