शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

घनवटसह सात पोलिस निलंबित

By admin | Updated: April 19, 2017 00:50 IST

खातेनिहाय चौकशीचे आदेश : वारणानगरातील चोरी प्रकरण

सांगली/कोल्हापूर : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील शिक्षक कॉलनीतील सव्वानऊ कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सध्याचे सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्यासह सहा पोलिसांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. या सर्व पोलिसांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी घनवट यांना, तर चंदनशिवेंसह सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, कुलदीप कांबळे व रवींद्र पाटील यांना सांगलीचे जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी निलंबित केले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याविरुद्ध कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात सव्वानऊ कोटी रुपयांची चोरी व अपहार असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सर्वजण दुसऱ्यादिवशी म्हणजेच सोमवारी ड्युटीवर हजर राहिले नाहीत. कोल्हापूर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा अहवाल मंगळवारी सांगली पोलिस दलास मिळाला. या अहवालाच्या आधारे पोलिसप्रमुख शिंदे यांनी चंदनशिवेसह सहा पोलिसांना निलंबित केल्याचा आदेश जारी केला आहे. (प्रतिनिधी) विश्वनाथ घनवट याचा अहवाल सांगलीचे जिल्हा पोलिसप्रमुख शिंदे यांनी पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट याच्याबाबतचा अहवाल कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सादर केला होता. या अहवालाच्या आधारे नांगरे-पाटील यांनी रात्री उशिरा घनवट यालाही निलंबित केले. घनवट याची सांगली जिल्ह्यात चार वर्षाची सेवा पूर्ण होत आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण, मिरज गांधी चौक येथे त्याची सेवा झाली आहे. सध्या त्याच्याकडे गुंडाविरोधी पथकाचा कार्यभार होता.