शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित निरीक्षक कामावर नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 00:55 IST

मालेच्या शेतकऱ्यांची मागणी : आंदोलनाचा इशारा; बोगस गाय-म्हैस खरेदी प्रकरण

कोल्हापूर : माले (ता. पन्हाळा) येथील भैरवनाथ विकास संस्था सभासदांच्या नावावर बोगस जिंदगी पत्रक करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केलेले जिल्हा बॅँकेचे निलंबित निरीक्षक भरत घाटगे यांना कामावर घेऊ नका, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. राजकीय हस्तक्षेप करून कोणी तरी सांगते म्हणून कामावर घेणार असाल तर तुमच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला. माले गावातील चारशे ते पाचशे शेतकऱ्यांनी सोमवारी बॅँकेत येऊन याबाबतचे निवेदन दिले. घाटगे हे जिल्हा बॅँकेच्या वारणानगर शाखेत २०११ ते २०१४ या काळात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना भैरवनाथ विकास संस्थेच्या सभासदांच्या नावावर परस्पर बोगस जिंदगी पत्रक व कर्ज मंजुरी पत्रक तयार करून कोट्यवधींचा गैरव्यवहार केला आहे. तसेच गाय व म्हैस प्रकरणात सभासदांच्या नावे बोगस प्रकरणे केली होती. ज्याच्या नावावर एक गुंठाही जमीन नसताना खोटी जिंदगी दाखवून कर्ज मंजुरी घेतलेली आहे. त्यांचा कारनामा लक्षात आल्यानंतर जिल्हा बॅँकेने त्यांना निलंबित केले होते; पण आता काही मंडळी त्यांना कामावर घेण्याबाबत प्रयत्न करत असल्याचे वारणा बॅँकेचे संचालक वसंतराव सोळसे यांनी निदर्शनास आणून दिले. घाटगेंना कामावर घेण्यासाठी विनय कोरे व विजयसिंह जाधव आग्रही असल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले. यावर संतप्त शेतकऱ्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांना फसवले, देशोधडीला लावले, त्यांना पाठीशी घालणार असाल तर चालणार नाही. वसुलीसाठी मात्र आमच्या दारात येऊ नका, असा टोला रघुनाथ चौगले यांनी हाणला. विनय कोरे व तुम्ही एकत्रित बसून विषय संपवा, असे सांगत हसन मुश्रीफ यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी काकासाहेब सोळसे, सुभाष जमदाडे, नामदेव चौगले, आक्काताई चौगले, सुमन सोळसे, अंजना सोळसे, आदी उपस्थित होते. कोरे यांच्याशी फोनवरून चर्चा हसन मुश्रीफ यांनी फोनवरून विनय कोरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर वसंतराव सोळसे यांनीही चर्चा करत घाटगेंना कामावर घेऊ नका. वर्षभर चाललेलं प्रकरण तुम्ही दोघांना बोलावून मिटवायला हवे होते. या प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत घाटगेंना कामावर घेऊ नका, असा सोळसे यांनी आग्रह धरला.मुश्रीफांना प्रसारमाध्यमांची अ‍ॅलर्जीचार-पाचशे शेतकरी जिल्हा बॅँकेत आल्याने प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तिथे पोहोचले. हे लक्षात आल्यानंतर तुम्ही मीडियावाल्यांना घेऊन आला नसता तर आताच प्रश्न सोडविला असता, असे सुनावत हसन मुश्रीफ शेतकऱ्यांवर चांगलेच भडकले.पाच पैसे न घेता ठराव देतोय!घाटगेंच्या कर्तृत्वाने ‘भैरवनाथ’ संस्था दोन कोटी ४७ लाखाने थकबाकीत गेली. त्याच व्यक्तीला विनय कोरे कामावर घेत असतील तर काय करायचे? त्यांच्याकडून पाच पैसे न घेता ठराव देतो. त्यांनी संस्था व घाटगेंना एकत्र घेऊन प्रकरण मिटविणे अपेक्षित होते, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.