शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लेखणीमुळे महिलांच्या आव्हानांना वाचा : सुषमा देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 01:08 IST

महिला राजकारणापासून ते खासगी कंपन्यांमध्ये सक्रिय असल्या तरी त्यांच्या पुढे पुरुषांच्या बरोबरीने काम करणे, घर-संसार, परंपरा सांभाळत आपले कर्तृत्व सिद्ध करणे हे आव्हान असते. अशा परिस्थितीत महिला पत्रकारांनी लेखणीतून

ठळक मुद्दे‘कोल्हापूर प्रेस क्लब’तर्फे महिला पत्रकारांचा सन्मान

कोल्हापूर : महिला राजकारणापासून ते खासगी कंपन्यांमध्ये सक्रिय असल्या तरी त्यांच्या पुढे पुरुषांच्या बरोबरीने काम करणे, घर-संसार, परंपरा सांभाळत आपले कर्तृत्व सिद्ध करणे हे आव्हान असते. अशा परिस्थितीत महिला पत्रकारांनी लेखणीतून महिलांच्या आव्हांनाना वाचा फोडावी, असे आवाहन ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या सुषमा देसाई यांनी शुक्रवारी येथे केले.

जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित पत्रकार महिलांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी उद्योजिका राजश्री जाधव-सप्रे प्रमुख उपस्थित होत्या. कोणताही धर्म किंवा परंपरा सांभाळताना त्याचा पहिला त्रास महिलांनाच होतो यात बदल झाला पाहिजे अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली. उद्योग क्षेत्रात तर फार कमी महिला आहेत हे उद्योजिका म्हणून काम करताना नेहमीच जाणवते. नेहमी इतरांच्या कार्यक्रमांचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकारांचा सत्कार होणे ही अभिमानाची गोष्ट आहे, असे मत जाधव-सप्रे यांनी व्यक्त केले.प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रेस क्लबच्या आवारात महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष उभारणार असल्याचे सांगितले. ‘लोकमत’च्या वरिष्ठ बातमीदार इंदुमती गणेश, ज्येष्ठ पत्रकार सुनंदा मोरे, सुरेखा पवार, स्वाती राजगोळकर, अहिल्या परकाळे, संघमित्रा चौगुले, श्रद्धा जोगळेकर, अश्विनी टेंबे, अनुराधा कदम, नंदिनी नरेवाडी, शुभांगी तावरे, स्वप्नाली मिठारी, धनश्री जाधव, नम्रता पाटील, सीमा पवार, पूनम देशमुख, कौशल्या आंग्रे, सुनंदा नाईक, संघवी राजवर्धन, अश्विनी खोंद्रे, माधुरी वाडकर, सुनीता कांबळे, श्रीया भास्कर यांंचा सत्कार करण्यात आला.जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवारी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने महिला पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुषमा देसाई, राजश्री सप्रे प्रमुख उपस्थित होत्या.