शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यकिरणांनी केले अंबाबाईचे चरणस्पर्श

By admin | Updated: November 10, 2016 00:25 IST

पहिला दिवस : दव, धुलीकणांबरोबरच किरणांना इमारतींचा अडथळा

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात बुधवारपासून किरणोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी किरणांनी देवीच्या गुडघ्यांना स्पर्श केला. त्यामुळे आज, गुरुवारी होणाऱ्या किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी किरणे कंबरेच्या वरपर्यंत पोहोचण्याची आशा निर्माण झाली आहे. भारतीय प्रगत स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून अंबाबाई देवीच्या मंदिराकडे पाहिले जाते. याशिवाय साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या हेमाडपंथी बांधकामाचा नमुना असलेल्या या मंदिरात वर्षातून दोनवेळा किरणोत्सव सोहळा होतो. यामध्ये दक्षिणायन व उत्तरायण असे दोन किरणोत्सव होतात. त्यापैकी दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्यास बुधवारी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी बुधवारी किरणांची तीव्रता चांगली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी किरणांनी सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी अंबाबाई देवीच्या गुडघ्यांपर्यंत स्पर्श केला. या किरणोत्सवात डाव्या बाजूच्या दोन इमारतींवरील जिन्याच्या टोप्या या किरणांमध्ये अडथळा ठरल्या. त्यामुळे बुधवारी पहिल्याच दिवशी किरणांना देवीच्या कंबरेपर्यंत पोहोचण्यात अडथळा आला. याशिवाय हिवाळ्यातील दव, धुलीकणांचाही यात अडथळा ठरला. हा सोहळा तसा ४९ मिनिटांचा ठरला. आज, गुरुवार किरणोत्सवाचा दुसरा दिवस असून, यामध्ये किरणांची तीव्रता लक्षात घेता ती देवीच्या कंबरेपर्यंत पोहोचण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. किरणांची तीव्रता चांगली असूनही ती टिकली नाहीत. कारण यामध्ये महाद्वार दरवाजाकडील डाव्या बाजूच्या मिणचेकर, आगळगावकर यांच्या इमारतींवरील जिने, टेरेसवरील टोपी यांचा अडथळा आला. हे अडथळे महापालिकेकडून दूर झाले, तर किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होईल. - उदय गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ. किरणांची तीव्रता चांगली होती; परंतु दव, धुलीकणांमुळे ती कमी झाली. इमारतींचे अडथळे दूर झाले तर पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होईल. अडथळा नसता तर पहिल्याच दिवशी किरणे देवीच्या कंबरेपर्यंत पोहोचली असती. -प्रा. किशोर हिरासकर, किरणोत्सव अभ्यासककिरणांची तीव्रता प्रथम चांगली होती; पण काही वेळानंतर वक्रीकरण किरणे होत गेल्याने तीव्रता कमी झाली. आज, गुरुवारी दुसऱ्या दिवशी होणाऱ्या किरणोत्सव सोहळ्यात किरण कंबरेपर्यंत पोहोचतील, अशी आशा आहे. - प्रा. मिलिंद कारंजकर, किरणोत्सव अभ्यासकदक्षिणायन : अशी पोहोचली किरणेठिकाणवेळ लक्समहाद्वार दरवाजा सायं. ४ : ५६ मिनिटे २०,६०० लक्सगरुड मंडपसायं. ५ :०२ मिनिटे १२,८०० लक्सपितळी उंबरठासायं. ५:३० ते ५:३६ मिनिटे १७५ लक्सदुसरी पायरीसायं. ५:४० मिनिटे १०६ लक्सतिसरी पायरीसायं. ५:४२ मिनिटे ३१ लक्सगर्भकुटीसायं. ५:४५ मिनिटे ७ लक्सचरणस्पर्श सायं. ५:४६ मिनिटे ६ लक्सगुडघ्याच्या खालपर्यंत सायं. ५:४७ मिनिटे ३ ते ६ लक्स