कोल्हापूर : पुरामुळे वीज पुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठा योजना बंद होऊ नयेत यासाठी पूरबाधित भागातील विजेच्या खाबांची उंची वाढविण्यासाठी महावितरणने सर्व्हे करावा, अशा सूचना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिल्या. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, उपविभागीय अधिकारी सुशांतकिरण बनसोडे यांच्यासह युवराज पाटील, भैया माने उपस्थित होते.
पाणीपुरवठ्याबरोबच गावात वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी, यापुढे पूरबाधित भागातील वाहिन्या तारांची उंची वाढविणे गरजेचे आहे. खाबांची उंची वाढविण्याबरोबरच ट्रान्सफाॅर्मरही (डीपी) उंचीवर बसविण्यात यावेत. विद्युत खाबांची उंची वाढविण्यासाठी लागणारा निधी महावितरणने त्यांच्या देखभाल दुरुस्तीतून करावा. या कामाकसाठी जादा निधी आवश्यक असल्यास याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावा, अशा सूचनाही मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.
कबनूर, लिंगणूरबाबत...
कबनूर येथील जमिनी वर्ग एक करण्याबाबत महसूल विभागाने पंधरा दिवसांत निर्णय घ्यावा, लिंगनूर कसबा नूल, ता. गडहिंग्लज येथील निवासी भूखंडावर मालकी हक्क लावण्याबाबत निर्णय घेण्यासाठी येथील रहिवाशांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे महसूल विभागास सादर करावीत, अशा सूचना त्यांनी केल्या.